प्रतिनिधी:-
पिकलं तर विकत नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.अशा परिस्थितीत मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याची केळी थेट इराणला निर्यात करण्यात आली आहे.मोहोळ तालुक्यातून केळीची पहिल्यांदाच निर्यात करण्यात आली आहे. शेतकऱ्याला तीन एकरातून खर्च वजा जाता २० लाखांचे निव्वळ उत्पन्न यातून मिळाले आहे.
मोहोळ तालुक्यात पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती.काळानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. विशेष म्हणजे नवनवीन प्रयोग करून कमी खर्चात अधिक उत्पन्न काढले जात आहे. त्यामुळे आता तोट्यातील शेती नफ्यात येऊ लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ शिवारातील तरुण शेतकरी बाळासाहेब माळी यांनी उसाला पर्याय म्हणून चार एकरांवर केळीची लागवड केली.
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पिकवलेली केळी थेट इराण या देशात निर्यात झाली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात तीन एकर क्षेत्रावर जी 9 रोपांची बुकिंग केली होती. थंडीच्या महिन्यात लागवड ही खूपच अडचणीची होती पण त्यावर मात त्यांनी केली.
लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण काळात त्यांनी ॲग्रीकॉस केळी पॅटर्ननुसार पिकाची निगा योग्य वेळी फवारणी करून, पाणी व्यवस्थापनावर लक्ष दिले. फण्यावरील मर्यादा काटेकोरपणे पाळून घेतली. त्यामुळे पिकाची गुणवत्ता टिकली आणि उत्पादन वाढले. आतापर्यंत ३० टन केळी निर्यात करण्यात आली आहे. ॲग्रीकॉस चे टेक्निकल डायरेक्टर अजय आदाटे यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांसाठी हा केळी एक्सपोर्ट चा नवा मार्गदर्शक प्रयोग ठरू शकतो.
धाडस केल्यास पर्यायी पिकांतून चांगला परतावा मिळतो.उसाला पर्याय म्हणून केळी लागवड केली. शेतकऱ्यांनी धाडस करून हे पीक घेतले तर त्यातून चांगला परतावा मिळू शकतो.
आम्ही अजून जास्त एकरांवर नवीन लागवड सुरू करणार आहोत.- बाळासाहेब माळी, शेतकरी.
दर्जेदार उत्पादन घेतल्यास परदेशात निर्यात करण्याची संधी.बाळासाहेब माळी यांच्या शेतातील तीन एकर केळी इराणला निर्यात होत आहे. निर्यातदार थेट शेतापर्यंत येऊन माल खरेदी करतात. योग्य निगा राखल्यास व दर्जेदार उत्पादन घेतल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही संधी उपलब्ध होऊ शकते. - संतोष माळी (जयकिसान कृषी, मोहोळ)
२५ लाख रुपयांच्या आसपास एकूण उत्पन्न मिळण्याची आशा.
डिसेंबर २०२४ अखेरीस तीन एकरांवर केळीची लागवड केली. तीन एकरांसाठी पाच लाखांचा खर्च आला. ९५ टन उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. त्यापैकी अंदाजे ८० टन निर्यात होणार. यातून २५ लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. खर्च वजा करता २० लाखांचा नफा होणार आहे. केळी निर्यात तंत्रज्ञानाविषयीच्या अधिक माहितीसाठी 9403852896 वर संपर्क साधावा ...