मंगळवेढा शहरात मोकाट कुत्र्यांच्या संखेत प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन वावर करावा लागत आहे.
यासंदर्भात भाजप पदाधिकारी व वारी परिवाराच्या वतीने नगरपालिकेस निवेदन देण्यात आले.प्रत्येक गल्ली मध्ये कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे लहान मुले,महिला व जेष्ठ नागरिकांचा चावा घेण्यासाठी मागे धावतात त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच रात्री मोठ्या प्रमाणात कुत्रे हल्ला करतात आतापर्यंत अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे तरी याचा तात्काळ बंदोबस्त करावा.
कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत. यावरती मंगळवेढा नगरपरिषदेने तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी नागेश डोंगरे,सुशांत हजारे,सतीश दत्तू,आनंद मुढे,अजीत लेंडवे,संजय माळी,येताळा खरबडे,प्रफुल्ल सोमदळे,अजय आदाटे,अजय गाडे उपस्थित होते.
नगरपालिका प्रशासनाने आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे ते न पूर्ण केल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल.