विदयार्थ्यांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आहार व व्यायामाची सांगड घालावी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

विदयार्थ्यांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आहार व व्यायामाची सांगड घालावी.


मंगळवेढा:-

परीक्षा काळात विदयार्थ्यांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी आहार व व्यायामाची सांगड घालणे आवश्यक आहे असे मत निमा उमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ.प्रिती शिर्के व डॉ. उदयसिहं दत्तू यांनी व्यक्त केले ते माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या आदेशानुसार श्री संत दामाजी महाविद्यालयात कॉपी मुक्त अभियान जनजागृती सप्ताह अंतर्गत दिनांक 23 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या परीक्षा काळात घ्यावयाचा आहार व काळजी याविषयावर बोलत होते.


अध्यस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव होते डॉ.शिर्के म्हणाल्या शरीराच्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आहार खूप महत्वाचा आहे परीक्षा काळात चांगली झोप होणे गरजेचे आहे.


मन सदृढ करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबर योगा,प्राणायाम,ध्यान करून विदयार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे असे सांगितले तर डॉ. उदयसिंह दत्तू म्हणाले विदयार्थी जीवनात वर्षभराचे नियोजन करता आले पाहिजे आपली आवड कशात आहे हे ओळखुन त्या क्षेत्राकडे गेल्यास कोणताही ताण येणार नाही परिणामी आपले आरोग्य चांगले ठेवता येईल शरीरातील कॅल्शियम,हिमोग्लोबिन वाढीसाठी सकस आहाराची गरज आहे असे सांगून सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी डॉ.जाधव यांनी व्यायामाचे महत्व सांगून अभ्यासात चिंतन आणि मनन महत्वाचे आहे असे सांगितले कॉपी मुक्त अभियान जनजागृती सप्ताहाचे प्रास्तविक प्रा.धनंजय गवळी यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी केला,सुत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले तर प्रा.सारिका काटे यांनी आभार मानले यावेळी सर्व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.



test banner