छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळा परिसरात सीसीटीव्ही सेट ची भेट देवून शिवभक्त चंद्रकांत चेळेकर यांचा वाढदिवस साजरा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळा परिसरात सीसीटीव्ही सेट ची भेट देवून शिवभक्त चंद्रकांत चेळेकर यांचा वाढदिवस साजरा




प्रतिनिधी :

मंगळवेढ्यातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळा परिसरात सीसीटीव्ही सेट भेट देत शिवभक्त चंद्रकांत चेळेकर यांनी वाढदिवस साजरा केला. मंगळवेढ्यातील तमाम जनतेच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

तरी या भव्य परिसरात देखरेखी साठी सीसीटीव्ही अत्यंत गरजेचा आहे. त्यावेळी शिवभक्त चंद्रकांत चेळेकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने १२ हजार रुपये खर्चून सीसीटीव्ही सेट बसवला आहे. आणि पुढे आवश्यकता वाटल्याच कॅमेरा वाढवण्याचा खर्च देखील करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. 



त्यांच्या या कार्याचा आणि वाढदिवसाचा सत्कार शिवालयात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला आणि शुभेच्छा दिल्या. 

शिवभक्त चंद्रकांत चेळेकर यांच्या कामाचे सर्वच शिवप्रेमी कडून कौतुक केले जात आहे. वाढदिवासाचा अनावश्यक खर्च टाळून अशी समाज उपयोगी कामे केल्यास गावचा पर्यायाने देशाचा विकास घडण्यास मदत होईलच. 

test banner