मंगळवेढा:-
श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षण सप्ताहाच्या दिनांक २५ जुलै या चौथ्या दिवशी कनिष्ठ स्तरावरील विदयार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक दिन साजरा करून विविध कलेची मुक्त उधळण करण्यात आली.
सुरवातीस कलेची देवता नटराज मूर्तीचे पूजन राहुल शहा,किसन गवळी,मुजफ्फर काझी,चंद्रशेखर कोंडूभैरी,प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव व उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थननेतून सुरवात करून विदयार्थ्यांनी तबला वादन,गीत गायन,लावणी नृत्य,स्टेजगीत सादर करून लोकसंस्कृतीची ओळख करून दिली.
तसेच पारंपरिक वेशभूषेतून भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवत राष्ट्रीय एकात्मता जोपसण्यात आली.
यावेळी सदर सांस्कृतिक दिन यशस्वी करण्यासाठी प्रा.गणेश भुसे,प्रा.विलास गुरव,प्रा.एस.टी.पाटील व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
प्रास्तविक प्राराजेंद्र गायकवाड यांनी केले तर प्रा.महेश डोके यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले केले यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.