मंगळवेढा:-
काल झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यामध्ये केंद्र सरकारकडून अतिशय थोडा निधी देण्यात आला.
त्या अतिशय अल्प प्रमाणात देण्यात आलेल्या निधी वरून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून महाराष्ट्र हे राज्य भारत देशातील आहे की देशाबाहेरचे व अन्य घोषणा देत महापुरुषांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी अर्थसंकल्प हा केंद्र सरकारचा असल्याने महाराष्ट्र हा देशात आहे की देशाबाहेर आहे असे यावेळी म्हणण्यात आले.या अर्थसंकल्पामध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या जाहिरातीसाठी विविध योजना आहेत पण यामधून महाराष्ट्रातील शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील दूध व्यवसायिकांना,शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निधीची कोणतीही तरतूद केली गेली नाही.
या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला ठोस निधी तर सोडाच इतर राज्यांप्रमाणे थोडेफार जरी दिले असते तरी महाराष्ट्राचे समाधान झाले असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे भारतातलेच आहे की भारताबाहेरचे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून करण्यात आला.
झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये एनडीए सरकारला चारसो पाराचा नारा गाठता आलं नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना चपराक बसल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे परिणाम भोगावे लागत असल्याचे भाजपची प्रवृत्ती स्पष्ट होतना दिसत आहे.
महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे ही जनता आपल्यावर झालेला अन्याय सहन करणार नाही तसेच जनतेच्या मनातील रोष आणि भावना आंदोलनाद्वारे मांडून भाजप विरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष अशा घोषणा देण्यात आल्या.महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा याचीही मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा,शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष संतोष रंदवे,युवक शहराध्यक्ष जमीर इनामदार,शहर उपाध्यक्ष वैभव ठेंगील,शहर सरचिटणीस सचिन वडतीले,बापु वस्त्रे , सदाशिव माळी,उमाकांत चिंचकर,महिला तालुका अध्यक्ष संगीता कट्टे,महिला शहर अध्यक्ष स्मिता अवघडे,मुझफ्फर काझी,किसन गवळी आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.