मंगळवेढा:-
आज मंगळवेढ्यात माजी सैनिक संघटना मंगळवेढा तालुका व वारी परिवाराच्या वतीने २६ जुलै हा कारगिल विजयाचा रौप्यमहोत्सव होणार आहे.
भारतीय सैनिकांच्या त्यागातून जिंकलेल्या कारगिल युद्धास आज २५ वर्ष पूर्ण होत असून सदर युद्धातील अनेक आठवणी जाग्या केल्या जाणार आहेत.
दुर्दम्य आशावाद,असामान्य कर्तृत्व,प्रखर राष्ट्रनिष्ठा व आदम्य साहस असणारे भारतीय सैनिक आपल्या कुटुंबापासून दुर राहून देशाच्या सिमेवरती आपले रक्षण करीत असतात.
सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात आपल्या भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावून विजय मिळविला त्या जवानांच्या शौर्याला व पराक्रमाला सलाम करावा या हेतुने कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांबद्दल एक दिवा कृतज्ञतेचा म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम आज सायंकाळी ५ वाजता दामाजी चौकात होणार आहे.पाऊस आल्यास दामाजी मंदिरामध्ये कार्यक्रम होईल तरी सर्व देशप्रेमी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी सैनिक संघटना व वारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.