मंगळवेढा:-
वेस्टइंडिज येथील बरबाडोस मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा टी-ट्वेंटी विश्वचषकच्या अंतिम सामन्यात पराभव करून विश्वचषक जिकंल्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
एक ही सामना न हारता तब्बल १७ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारताने टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला आहे.सदर विजयाने मंगळवेढ्यात देखील सर्व देशप्रेमी नागरिकांनी शिवालयासमोर जल्लोष केला.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी,शशिकांत चव्हाण,अजित जगताप,दिगंबर भगरे,नारायण गोवे,दत्तात्रय भोसले,प्रफुल्ल सोमदळे,सोमनाथ माळी,संभाजी घुले,सचिन डोरले,बाळासाहेब नागणे,सचिन गोवे,दत्तात्रय हजारे,सुदर्शन यादव,नागेश डोंगरे,ज्ञानेश्वर कौंडूभैरी,वैभव खराडे,समाधान हेंबाडे,राहुल सावंजी,चंद्रशेखर कौंडूभैरी, दिलीप जाधव,शैलेश गोवे,आयाज शेख,सत्यजीत सुरवसे,गणेश धोत्रे,विजय हजारे,सुशांत हजारे,प्रतीक पडवळे,सदाशिव कौंडूभैरी,प्रदीप गायकवाड,प्रवीण खवतोडे,हर्षद डोरले,राहुल हजारे,स्वप्निल फुगारे,सोनू भगत,अनिल मुदगुल,सचिन साळूंखे,दिनेश वेदपाठक,सुनील लेंडवे,सुमित रजपूत,प्रकाश मुळीक,जमीर इनामदार,चंद्रकांत चेळेकर,विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू यांचेसह देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.