मंगळवेढा:-
श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात दिनांक १२ मार्च रोजी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.पवार यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य सदाशिव कोकरे, पर्यवेक्षक प्रा.राजेंद्र गायकवाड यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.