राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)गटाच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष पदी यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)गटाच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष पदी यांची निवड.


मंगळवेढा:-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष पदी मंगळवेढा येथील नजीर इनामदार यांची निवड करण्यात आली. 


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी नजीर इनामदार यांना निवडीचे पत्र देण्यात आले.


इनामदार यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक या पदाची धुरा सांभाळी आहे.तसेच सामाजिक कार्यात ही त्यांचे मोलाचे योगदान आहे.


त्यांची खिदमत चारिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून रक्तदान शिबिर,खतना कॅम्प आसे अनेक सामजिक उपक्रम मंगळवेढा येथे राबविण्यात येतात.


त्यांच्या या निवडी वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस लतीफ तांबोळी,इद्रिस नायकवडी,वसीम कुरणा,गौसपाक मुजावर,बाबुल मुजावर,रशीद तांबोळी आदी मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


test banner