जिजाऊच्या लेकींनी घातला शौर्याचा व पराक्रमाचा जागर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

जिजाऊच्या लेकींनी घातला शौर्याचा व पराक्रमाचा जागर.


मंगळवेढा:-

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मराठवाड्यातील पहिले महिला शाहीरी पथक आम्ही जिजाऊच्या लेकी या कार्यक्रमातून डॅा निशिगंधा साळुंके व सहकारी यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा जागर घातला.


सुरवातीस प्रणितीताई भालके यांच्या हस्ते व सीमाताई परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. 


प्रारंभी आधी नमन नमन गणरायाला वंदन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली तसेच महाराष्ट्राची महती वर्णन करणारे गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले स्री नारीचा गौरव करणारे आम्ही जिजाऊच्या लेकी, शिवजन्माचा पाळणा,स्वराज्य स्थापन करण्याची शपथ, राज्याभिषेक सोहळा,गडकोटांना वंदन करणारे उगवला तारा तिमीर हारा गर्जा शिवाजी राजं अशी अनेक पोवाडे,शिवगीते,नवरा नको गं बाई दादला नको बाई भारूड,स्फूर्तीगीतांतून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सादर करण्यात आली.


यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी,मेनका सावंजी,निलाताई आटकळे,डॅा अरूणाताई दत्तू,अरूणाताई माळी, सुनिता सावंत,विशाखा खवतोडे,रतनताई पडवळे,राखीताई कौंडूभैरी,सुप्रिया जगताप,सीमाताई बुरजे,उषादेवी सारडा,संगिता कट्टे,आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्वाती दिवसे- कौंडुभैरी यांनी करून आभार मानले.test banner