महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्यावतीने मंगळवेढा शहरात विविध विकास कामांसाठी निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्यावतीने मंगळवेढा शहरात विविध विकास कामांसाठी निवेदन.


मंगळवेढा:-


महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने आज देण्यात आलेल्या मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कोल्हे साहेब यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देण्याचे कारण गेली 25 ते 30 वर्षापासून मंगळवेढा शहराचा विकास झालेलाच नाही तेच खराब रस्ते त्याच खराब गटारी घाणीचा साम्राज्य, झाकण नसलेले पाण्याचे व्हॉल्व,रोडवर कचऱ्याचे साम्राज्य हे काही मंगळवेढा शहराला नवीन नाही आणि विशेष म्हणजे मंगळवेढा नगरपरिषदेच्या समोरची गटार कायम भरलेली असते. 


त्यावर आज पर्यंत कोणाचेही लक्ष कधीच त्या कायम भरलेल्या गटारीवर गेलेलं नाही आणि त्यावर आज पर्यंत या गटारीवर कोणतं काम ही केलेलं नाही आणि आज आजही त्याच अवस्थेत येथील गटार तुडुंब भरलेल्या गटार तुम्हाला बघायला भेटेल आणि तसेच लहान मुलांना खेळायला एकच गावात खेळायला बाग असून ते पण अर्ध्या अवस्थेत आहे ती म्हणजे  गणेश बाग आपल्या मंगळवेढा शहराला असं कोणतच पार्क किंवा बोटॅनिकल गार्डन किंवा बोटिंग वारकऱ्यांसाठी वारकरी भवन करून तरुण मुलांना जिम करण्यासाठी आणि पैलवानांना तालीम नाही.


तसेच सुशोभीकरणाचे देखावे असे कुठलाही यापैकी मुद्दा गावात नसून त्यामुळे आज पर्यंत कोणीच न मांडलेले मुद्दे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर- राजवीर हजारे मनसे शहराध्यक्ष यांच्या वतीने खालील मागण्या मी नगरपालिकेकडे केलेल्या असून त्यामध्ये काही चूक किंवा काही बरोबर असेल तर मला तुमचा अभिप्राय कळवावा माझ्या व्हाट्सअप नंबर वरती 9890847784 


प्रमुख मागण्या:-


१)कृष्ण तलाव येथे संत सृष्ठी उभा करणे : कृष्ण तलाव ही मंगळवेढा शहरातील एक फार मोठे एतिहासिक वारसा लाभलेले एक ठिकाण असून श्रीकृष्ण तलावाच्या ठिकाणी भली मोठी संत सृष्ठी उभा करावी जेणेकरून मंगळवेढा शहराच्या सौंदर्यात भर पडेल व नगरपालिकेला महसूल पान मिळेल तसेच त्या श्रीकृष्ण तलावाचे एकूण क्षेत्र १८.२४ हेक्टर इतके असून इतक्या मुबलक क्षेत्रा वर आपल्या शहराचा भव्य असा देखावा उभा राहील व आपल्या शहराच्या जडणघडणेला आणि शहराच्या विकासाला चालना मिळेल. 


२)श्री संत दामाजी तलाव येथे नाना -नानी पार्क व शिवकालीन शिवसृष्ठी लेजार शो उभा करणे : श्री संत दामाजी तलावाचे एकूण क्षेत्र ५.५६ हेक्टर  इतके असून त्यामध्ये नाना -नानी पार्क व शिवकालीन शिवसृष्ठी लेजार शो उभा करणे जेणेकरून शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ योग्य असून आणि भविष्यातील येणाऱ्या तरुण पिडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यात भर पडेल आणि तसेच शहराच्या नावनिर्माणात पान भर पडेल. 


३)बोराळे नाका येतील कुंभार तलाव येथे  बोटेनिकल गार्डन व बोटिंग उभा करणे : कुंभार तलावाचे एकूण क्षेत्र ४.४ हेक्टर  इतके असून त्या तलावामध्ये पाण्यातील बोटिंग व तुलसी वृंदावन आणि  बोटेनिकल गार्डन असे विविध प्रकल्प मंगळवेढ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून  बोटेनिकल गार्डन उभा करणे.


४)मंगळवेढा तालुका ,शेगांव ,कर्नाटक येथून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभा करणे:मंगळवेढा नगरपरिषदे समोरील जुन्या बांधकाम विभागाची जागा व तिथे लागूनच असलेली जुन्या न्यायालयाची(कोर्टाची) जागा नगरपालिके कडे वर्ग करून त्या जागेवर वारकरी भवन उभारावे जेणेकरून येणार वारकरी संप्रदाय सुखी होईल.


५)नाट्यगृह उभा करणे : गणेश बागे शेजारील नगरपालिकेच्या जुन्या मंगल कार्यालय असलेल्या जागेच्या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील कलावंतांसाठी नाट्यगृह उभारावे जेणेकरून मंगळवेढा तालुक्यातील कलावंतांना एक नवीन व्यासपीठ मिळेल व पुढे जाण्यास चालना मिळेल.                                                                                                                                                                                                                                         

६)संतांना घेऊन उभी असलेली विठ्ठल मूर्ती उभा करणे : बोराळे नाका चौकामध्ये मुस्लिम स्मशान भूमीच्या चिटकून असलेल्या कॉर्नरच्या जागेमध्ये ५० फुट उंचीची भली मोठी आपल्या संतभूमितील सर्व संतांना घेऊन उभी असलेली विठ्ठल मूर्ती उभा करणे जेणेकरून शहरात दोन्ही बाजूने येणाऱ्या वारकरी दिंडीला प्रथम दर्शन होईल. 


७)नवीन व्यायाम शाळा व तालिम उभा करणे : आता सुरू असलेली नगरपालिके कडील व्यायाम शाळेच्या ठिकाणी अत्याधुनिक जीम व तालिम बनवावी जेणेकरून भविषतील तरुणांसाठी योग्य सोय होईल व नवीन कुस्ती पटू घडविण्यास मदत होईल.


 ८) संत कान्होपात्रा वास्तु शिल्प उभा करणे-संतभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा शहरांमध्ये मुरलीधर चौक येथे संत कान्होपात्रा वास्तुशिल्प उभा करणे. 


या सर्व मागण्या मी मनसेच्या वतीने करतो व आपला व मंगळवेढा शहरांच्या जनतेचा मला या मागणीसाठी सशस्त्र पाठबळ मिळावं या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपली साथ मला महत्त्वाची व मोलाची असून ती साथ मला आपण जरूर द्याल हीच अशा अपेक्षा करतो.


test banner