मंगळवेढा:मंगळवेढा शहरातील पंढरपूर रोडवरील रिध्दी सिद्धी महागणपती मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दि.26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती उद्योजक वैभव नागणे यांनी दिली आहे.
दि.12 फेब्रुवारी पासून दि.14 फेब्रुवारी पर्यंत रिध्दी सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न होणार आहेत.
मंगळवेढा शहरातील सर्वात आकर्षक गणपती मंदिर सुरू होत असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
दि.12 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमास शहरातील व परिसरातील नागरिकांचा मोठा लोकसहभाग मिळणार आहे.
आज होणाऱ्या बैठकीसाठी सर्व नागरिकांनी व महिलांनी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ आदींनी पंढरपूर रोड येथे सायंकाळी 5 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन अशोक कोळी यांनी केले आहे.