मंगळवेढा:पिंपरी चिंचवड (पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त मंगळवेढ्यातील पत्रकार सचिन इंगळे यांना सिनेकलाकार तथा मंडळाचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी नियामक मंडळ सदस्या तेजस्विनी कदम यांनी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व क्षेत्रात योगदान असल्याचे सांगत आमच्या संस्थेचे शिक्षक सचिन इंगळे हे पत्रकारिता क्षेत्रात चांगले काम करतात असे उपस्थितांना सांगितले यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मंगळवेढा माजी अध्यक्ष यतीराज वाकळे सह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
प्रा.तेजस्विनी कदम यांच्या नेतृत्वाखाली नाट्य परिषदेच्या मंगळवेढा शाखेतील 35 सदस्यांनी नाट्यसंमेलनात सहभाग नोंदवला.
पिंपरी चिंचवड येथे 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 5 ते 7 जानेवारी दरम्यान झाले.