शिक्षक नेते संजय चेळेकर यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन - संभाजी तानगावडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

शिक्षक नेते संजय चेळेकर यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन - संभाजी तानगावडे

प्रतिनिधी 


    सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक, माजी चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मनपा.नपा सरचिटणीस संजय चेळेकर यांचा ५० वा वाढदिवस गुरूवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी असून सदर वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघ ,गुरूसेवा परिवार व कल्पतरू परिवाराच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी तानगावडे यांनी दिली. 



     रविवार दि.१४ जाने रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा सोसायटी शाखा मंगळवेढा येथे रक्तदान शिबिर, सोमवार दि.१५ जाने रोजी मंगळवेढा येथील मुकबधीर शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, मंगळवार दि.१६ जाने रोजी पं.स. शिक्षण विभागास कपाट भेट देणे, बुधवार दि.१७ जाने रोजी वृक्षारोपण , गुरूवार दि.१८ जाने रोजी लोकमंगल फाऊंडेशन अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ५५० गरजूंना घरपोच डबे भेट देण्यात येणार आहेत आणि

नगरपालिका शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. 



गुरूवार दिनांक १८ जानेवारी रोजी स्नेहमेळावा व वाढदिवस कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता महा. राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांचे अध्यक्षतेखाली तर माजी सहकारमंत्री आमदार सुभाषबापू देशमुख, मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर, सो.जि.म.स.बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील , विठ्ठल शुगरचे माजी चेअरमन भगिरथ भालके, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत , नंदकुमार पवार ,लतीफ तांबोळी ,येताळा भगत , तेजस्विनी कदम ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार मदन जाधव , मुख्याधिकारी चरण कोल्हे , पोलीस निरीक्षक रणजीत माने , उपशिक्षणाधिकारी संजय जावीर , गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोगेश्वरी मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे संपन्न होणार आहे. 

    तरी सर्व शिक्षक बंधू भगिनी व मित्रपरिवार यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघ, तालुका गुरूसेवा परिवार व कल्पतरू परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

test banner