दत्तात्रय भोसले यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

दत्तात्रय भोसले यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.

                     मंगळवेढा:ता 23जानेवारी2024 हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त,महाराणी ताराबाई हायस्कूल,मंगळवेढा येथे दतात्रय भोसले शिवसेना शहर अध्यक्ष(उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलेेे.

                 या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून नारायण गोवे होते तर उपस्थित म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका निता कदम आणि बंडु चव्हाण,मुज्जमिल काझी, रवि कौंडुभैरी,गणेश बाबर, निवृत्ती जाधव, सागर केसरे आदि मान्यवर उपस्थित होते.


                    या प्रसंगी जाधव यांनी स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्या ची ओळख आपल्या मनोगतातुन शालेय विद्यार्थ्यांना सांगितले.

                    तर दत्तात्रय भोसले यांनी प्रशालेला भेट म्हणून 10 ब्रास शहाबादी फरशी देऊन सहकार्य केले.test banner