मंगळवेढा तालुक्यात राजकीय हालचाली वाढल्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २८ जानेवारी, २०२४

मंगळवेढा तालुक्यात राजकीय हालचाली वाढल्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

 टीम संवाद न्यूज:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाच्या जिल्हा कार्यकारणी निवडी जाहीर करण्यात आल्या असून जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

 यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष पदी अजित जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

तर तालुका अध्यक्ष पदी भारत बेद्रे तर शहर अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर भगरे,प्रांतिक सदस्य पदी प्रवीण खवतोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर जिल्हा उपाध्यक्ष पदी माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड यांची तर खजिनदार पदी राजेंद्र हजारे यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी शंकर माळी,भारत नागणे व विठ्ठल डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट यांच्या कडून पक्ष बळकटी साठी व पक्ष वाढी साठी जिल्हा कार्यकारणी निवडी जाहीर.
 

आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर डोळ्यासमोर असताना अजित पवार गटाची ही घडामोड सुरू असताना दिसत आहे.test banner