मंगळवेढा:3 जानेवारी महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने प्रशालेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर आवताडे यांनी भूषविले.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सुनंदा माने, शैलजा माने, निकिता भगत, विद्या खरात, मिलिंद कुलकर्णी, शहाजी ढोबळे, संतोष दुधाळ, नितीन मोरे इत्यादी उपस्थित होते. आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन जीवनातील विविध प्रसंग सांगत भाषणे सादर केली.
प्रशालेतील सहशिक्षिका निकिता भगत यांनी आपल्या मनोगतातून मुलींनी 3 जानेवारी हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा असे सांगितले.अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक शंकर आवताडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
या स्पर्धेत एकूण 26 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलजा माने यांनी केले अध्यक्षीय सूचना इयत्ता नववीमधील विद्यार्थीनी तनिष्का जाधव हिने मांडली तर गौरी भोसले हिने या सूचनेस अनुमोदन दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोहिनी घाडगे हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशालेतील गणेश यादव सिद्धेश्वर अवघडे, संभाजी सलगर,हरि कोंडूभैरी, सोमनाथ माळी, प्रशांत उपाध्ये यांनी परिश्रम घेतले.