माती परिक्षण महत्व व त्याची थोडक्यात माहिती ! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

माती परिक्षण महत्व व त्याची थोडक्यात माहिती !
▪️माती परीक्षण माती परीक्षणाचे फायदे काय?
▪️माती परीक्षण साठी माती कशी घ्यावी? 

 आपण ज्या शेतीतून जमिनीतून पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर किमान 1 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे असते.  

माती परीक्षण ही शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. 

याद्वारे शेतात घेण्यात येणारे पीक नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. 

तसेच याने पीकांना द्यावयाच्या खताची मात्रा पण निश्चित करता येते. 

यामध्ये नत्र पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमून्यात किती प्रमाण आहे हे बघितल्या जाते तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते.

     
  ♦️माती परिक्षण pH पातळी

              शेतकर्यांना योग्य प्रकारचे खत शोधणे अत्यंत अवघड वाटते, जे त्यांच्या जमिनी साठी उपयुक्त आहेत. खत वापरताना त्याने त्याच्या पिकाची  गरज आणि जमिनीची वैशिष्ट्ये लक्षात घेणे आवश्यक आहे. शेतीसाठी चांगले आणि आर्थिक फायद्या च्या खतांचा वापर करणे आणि शेती उत्पादनात वाढ होणे, उत्तम माती व्यवस्थापनास चालना देणे, हे माती-चाचणी कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे.

             एकाच पिकासाठी आवश्यक असलेली खताची मात्रा आणि प्रकार हे शेत व एकाच शेतातील माती ह्या नुसार बदलू शकते. शेताची सुपीकता  वाढविण्यासाठी योग्य खताचा प्रकार व त्याची मात्रा निश्चित करणे गरजेचे असते. माती परीक्षण विना अयोग्य प्रकारची व अयोग्य प्रमाणात खत दिल्यास पिकांचे फार मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. त्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. मृदा तपासणी व्यावसायिक प्रयोगशाळे - द्वारे केली जाते. 


प्रयोगशाळेतील चाचण्या ही तीन प्रकारांमध्ये वनस्पतींच्या पोषक तत्वांचे परीक्षण करतात.

१. महत्वाचे पोषक: नायट्रोजन(N), फॉस्फोरस(P), पोटॅशियम(K)

२. माध्यमिक पोषक: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर

३. सूक्ष्मपोषक: बोरॉन (boron - B), क्लोरीन (chlorine - Cl), तांबे (copper - Cu), लोहा (iron - Fe), मॅगनीज (manganese - Mn),        मोलिबडेनम (molybdenum  - Mo) आणि जस्त (zinc - Zn).

ह्या खेरीज मातीची pH पातळी पण तपासली जाते त्यावरून मातीची आम्लता (अम्लीय किंवा अल्कधर्मी) कळून येते.

♦️ माती परीक्षण फायदे : 

▪️पिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सामू PH ,विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3, सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N, स्फुरद P, पालश K , फेरस(आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn,  सल्फर S, Boron B त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे, पान गळणे शिरा सोडून इतर पीकांची वाढ पूर्ण होत नाही. 

▪️ती अन्नद्रव्ये मिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते. 

▪️विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणे आवश्यक असते. त्याद्वारे शेतक-यांना समजते की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे.

▪️मातीपरीक्षणामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता व उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात घालावे याची माहिती मिळते.

▪️माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते.

▪️त्याने गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. याद्वारे शेतातील पिकाचे योग्य नियोजनाने सुमारे दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ प्राप्त करता येतो.

▪️पीक पेरणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी पूर्ण माहिती होते. 

▪️त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.


♦️माती तपासणीचा उद्देश:

१. पोषक घटकांच्या पातळीनुसार मातीची विभागणी करणे

२. त्यानुसार खत शिफारस करणे. खत निवडीला अचूक मार्गदर्शन करणे.


♦️माती परिक्षणाची जागा कशी निवडावी :

१. मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा.
२. शेतातील वेगवेगळ्या ठिकाणाची माती गोळा करावी. नमुने घेण्याची जागा हि मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती ह्या वर ठरते. त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. फार लहान भाग पाडू नयेत.
३. जुने बंधारे (पाटाखालील बांधा जवळची), दलदली ची जागा, नुकतेच खत दिलेले व खते आणि कचरा टाकण्याची जागा, गुरे बसण्याची व झाडाखालची माती असणारी जागा मातीचे नमुने घेण्यासाठी निवडु नये.
४. सर्वात अगोदर वरील माहिती ध्यानात धरून नमुने घेण्याची जागा निश्चित कराव्यात.
५. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. माती नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी.
६. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4 समान भाग करावे.
समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा 4 समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी.
७. वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती कापडी पिशवीत भरावी आणि ॲग्रीकॉस माती परीक्षण केंद्र मध्ये जमा करावी.

🌱पिकांचे उत्पादन वाढवायचंय?
👥माती परीक्षण कसे आणि का करायचं? 

♦️माती परीक्षण महत्व, कशी करायची? पुढं काय?
🛡️ॲग्रीकॉस पॅटर्न नक्की पहा

आपल्या आवडत्या यू ट्यूब चॅनल वर...
https://www.youtube.com/channel/UCQFZEc_MV4mjfBREWlGBpag

👨🏻‍🏫Dr. Agricos 9403460194, 9403852896


test banner