श्री संत दामाजी महाविद्यालयात आविष्कार संशोधन महोत्सव तयारीसाठी पोस्टर सादरीकरण. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात आविष्कार संशोधन महोत्सव तयारीसाठी पोस्टर सादरीकरण.



                     विद्यार्थ्यांच्या नवकल्पना व संशोधनाला चालना देण्यासाठी व त्या समाजापुढे मांडण्याकरिता दरवर्षी अविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार याही वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर येथे दिनांक ३ व ४ जानेवारी २०२४ रोजी अविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

                      सदर महोत्सवात सहभागी होऊन संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन बी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार संशोधन विभागाचे समन्वयक प्रा डॉ महेश घाडगे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सरावासाठी पोस्टर्सचे सादरीकरण करण्यात आले.

                    याप्रसंगी डॉ पवार म्हणाले की,विद्यार्थ्यांनी या संशोधन महोत्सवासाठी वेगवेगळ्या,नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयांची निवड केली असून,चांगल्या पद्धतीचे संशोधन केले आहे. त्यांचे हे संशोधन कौतुकास पात्र आहे असे मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना  संशोधनासंदर्भात सूचनाही देऊन शुभेच्छा दिल्या.

                    यावेळी संशोधन सादरीकरणामध्ये महाविद्यालयातील दीक्षा ढावरे,कोमल देवकते,साक्षी दोडके,अर्पिता लाड,राम जाधव, आकांक्षा गावकरे,प्रणाली कांबळे यांनी सहभाग नोंदवला होता यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

                   कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

                    सूत्रसंचालन व प्रास्ताविक अविष्कार संशोधन विभागाचे समन्वयक प्रा डॉ महेश घाडगे यांनी केले.



test banner