टीम संवाद न्यूज :
सध्या कांदे 1700 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहेत. गेल्या आठवड्यात कांद्याची बाजारपेठ कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे
♦ अतिमहत्वाची कारणे :-
१ . निर्यात बंदी लवकर उठणार नाही
२ . पावसाळी कांदा साठवून ठेवता येत नाही
३ . सोलापुरात कांदा तेजीत जातो
४ . पाऊस नसल्यामुळे कमी पाण्यात येणारे नगदी पीक
५ . कांदा लागवड वाढली
कांद्याचे उत्पादन 25 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असल्याने सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, निर्यात बाजारावर याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर आधीच निम्म्यावर पोहोचले आहेत. बाजारपेठ वाढताना दिसत आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनाचा सरकारचा अंदाज चुकीचा असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या कांदे 1700 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहेत. गेल्या काही आठवड्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजार आणखी काही दिवस दबावाखाली राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
अजय आदाटे
कृषितज्ज्ञ