कोणत्या कारणावरून मंगळावेढा तालुका दुष्काळातून वगळला राष्ट्रवादिचे कार्याध्यक्ष माणिक गुंगे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

कोणत्या कारणावरून मंगळावेढा तालुका दुष्काळातून वगळला राष्ट्रवादिचे कार्याध्यक्ष माणिक गुंगे.



                  मंगळवेढा: मंगळवेढा तालुका प्रतिनिधी मंगळवेढा तालुका गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या छायेत असून. सध्या महाराष्ट्र मध्ये दुष्काळ तालुके जाहीर केले असून त्यामध्ये मंगळावेढा तालुका कोणत्या कारणावरून वगळण्यात आला असे मत मंगळावेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष श्री माणिक गुंगे यांनी मांडले. 

                 सध्या  संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्व भागांमध्ये कमी दाबाचा पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुके हे दुष्काळ जाहीर करण्यात आले आहेत परंतु सर्वात कमी पाऊस पडून सुद्धा मंगळवेढा तालुका दुष्काळ यादीतून का वगळण्यात आला याचे उत्तर राज्य सरकारने व प्रशासनाने द्यावे कोणत्या अधिकाऱ्याने या भागातील सर्वे केला होतो कोणत्या पद्धतीने रेकॉर्डिंग करून वरती पाठवून त्याची नोंद कशा प्रकारे केली याचीही दखल प्रशासनाने व राज्य शासनाने घेणे गरजेचे आहे.

                सध्या मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात शेतीच्या पाण्याची सोडाच पिके जळून गेले आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची सुद्धा बिकट अवस्था असून हा तालुका दुष्काळ भागातून का वगळण्यात आला याचे उत्तर प्रशासनाने व राज्य शासनाने द्यावे व प्रशासनाने फेर सर्वे करून मंगळावेढा तालुका दुष्काळ यादीत  जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे मत माणिक गुंगे यांनी मांडले...


test banner