कौतुकास्पद!मंगळवेढा-रायगड सायकल मोहिमेचे गुरूवारी प्रस्ऱ्थान,वारी परिवाराचा अनोखा उपक्रम - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

कौतुकास्पद!मंगळवेढा-रायगड सायकल मोहिमेचे गुरूवारी प्रस्ऱ्थान,वारी परिवाराचा अनोखा उपक्रम



                    मंगळवेढा:मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबकडून दुर्गराज रायगड संवर्धन व पर्यटन विकास जनजागृतीसाठी मंगळवेढा ते रायगड ऐतिहासिक सायकल मोहीमचे प्रस्थान गुरूवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शिवालयातील शिवमुर्तीचे पूजन करून सकाळी ६.०० वाजता होणार आहे.

                    सदर ऐतिहासिक सायकल मोहीम चार दिवसाची असुन पंढरपूर-वेळापूर-माळशिरस-नातेपूते-फलटण-शिरवळ-भोर-वरंध-महाड-पाचाड-रायगड या मार्गावरती गडकोट स्वच्छता व संवर्धन विषयी जागृती करण्यासाठी पत्रके वाटण्यात येणार आहे.

                   स्वराज्याच्या स्थापनेपासून अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांना रायगड हा मूर्त साक्षीदार आहे किल्ल्यावरील जगदीश्वर मंदीर,बाजापेठा,छत्रपती शिवरायांची समाधी,राजवाडा,वाडे,महादरवाजा,शिरकाई मंदीर,राजदरबार,अष्टप्रधान वाडे व सप्त मंजिली बुरुज तर पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांचा वाडा व समाधी ही ठिकाणे आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत आहेत.

                  हे खरे देशाचे वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाचा अनमोल असा ठेवा आहे. त्यामुळे या ऐतिहासिक अभिमानाच्या वारशाचे भावी पिढीसाठी जतन व्हावे तसेच शिवकाळात जसा रायगड होता तसाच रायगड पुन्हा एकदा सर्वांना याची देही याची डोळा पाहता यावा.

              त्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समग्र विकास व्हावा यासाठी मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबकडून मंगळवेढा ते रायगड या ऐतिहासिक सायकल मोहिमेतून जनजागृती करण्यात येणार आहे.

             महाराष्ट्र शासनाने रायगड किल्ला जतन,संवर्धन व पर्यटन विकास करण्याचे काम हाती घेण्यासाठीही वेळोवेळी पाठपुरावा केला जाणार आहे. सदर सायकल मोहीमेकरीता जगदंबा परिवाराचे अध्यक्ष चंद्रकांत घुले,शिर्के मल्टीस्पेशीलीटी हॅास्पिटलचे डॅा शरद शिर्के,समर्थ हॅास्पिटलचे डॅा नितीन आसबे,ट्रॅव्हल्स ग्रूपचे अविनाश चेळेकर,संजय डांगे,सचिन आवळेकर व सप्तशृंगी नवरात्र मंडळाचे माजी अध्यक्ष नागेश डोंगरे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.



test banner