मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्यातील झंझावती महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
१५ नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत त्यांचा झंझावती दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यावेळी बोलताना त्यांनी दौऱ्याच्या स्वरूपाबद्दल माहिती दिली.
अशाप्रकारे असणार त्यांचा दौरा......
१५ नोव्हेंबर रोजी वाशी,परांडा,करमाळा १६ नोव्हेंबर दौंड,मायणी १७ नोव्हेंबर सांगली,कोल्हापुर, इस्लामपूर,कराड १८ नोव्हेंबर रोजी सातारा,मेंढा,वाई,रायगड.
१९ नोव्हेंबर रायगड रायगड दर्शन,रायगड ते पाचाड दर्शन,महाड, मुळशी,आळंदी २० नोव्हेंबर तुळापूर,पुणे,खराडी,चंदननगर,खालापूर,कल्याण.
२१ नोव्हेंबर ठाणे,पालघर, त्रंबकेशवर २२ नोव्हेंबर विश्रांतगड,संगमनेर,श्रीरामपूर.
२३ नोव्हेंबर नेवासा,शेवगाव,बोधेगाव,धोंडराई आणि आंतरवाली.
असा असणार त्यांचा तिसऱ्या टप्प्यातील दौरा,तर राहिलेले मराठवाडा,विदर्भ असे दौरे आपण चौथ्या टप्प्यात करणार आहोत अश्याप्रकारे आपण ६ टप्प्यांमध्ये दौरे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की या दौऱ्याची सुरुवात कोल्हापुरमधून शाहू महाराजांच्या स्मारकापासून करणार आहे.
या दौऱ्यामध्ये ते गावोगावी झंजावती सभा घेणार असल्याचे म्हणले आहेत.