मराठा आरक्षणाच्या आंदोलनार्थ मंगळवेढ्यात कडकडीत बंद. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

मराठा आरक्षणाच्या आंदोलनार्थ मंगळवेढ्यात कडकडीत बंद.                     मंगळवेढा:मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही याबद्दल सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाज मंगळवेढा तालुक्याच्या वतीने मंगळवारी मंगळवेढा बंदची हाक दिलेली होती त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा व्यक्त केला.

       


            मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक दिवसापासून सातत्याने विविध आंदोलने सुरू आहेत सोमवारी जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्याची माहिती सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर मंगळवारी मंगळवेढा बंद ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजा वतीने घेण्यात आला तत्पूर्वी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर आटकाव आंदोलन करण्यात आले.

                   शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बंद पुकारण्यात आला होता मंगळवेढा शहरात दिवसभर दूध मेडिकल दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

                   संत दामाजी चौक,संत चोखामेळा चौक, शिवप्रेमी चौक,नवीन बाजार मंडई परिसर याशिवाय पंढरपूर रस्ता कृषी उत्पन्न बाजार समिती शॉपिंग सेंटर,संत चोखामेळा नगर,संत दामाजी नगर परिसरातील सर्व दुकाने बंद होती.

                  शहरालगत असलेल्या बोराळे नाका सांगोले नाका भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

                शहरातील दामाजी चौकामध्ये असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषण स्थळी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सरकारच्या विरोधामध्ये निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी सकल मराठा समाजाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सरकार विरोधामध्ये निदर्शने व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

                सोमवारी बार असोसिएशन ने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पाठिंबाचे पत्र देत शहरातील विधीज्ञाने सकाळी साखळी उपोषणस्थळी भेट देऊन काहीवेळ ठिय्या आंदोलन केले.


test banner