गुणरत्न सदावर्ते याच्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

गुणरत्न सदावर्ते याच्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन.


       


           मंगळवेढा: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर असताना व श्री मनोज जरांगे-पाटील यांच्या १४ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या सभेनंतर गुणरत्न सदावर्ते हे आपल्या वक्तव्यातून मराठा समाजाच्या भावना दुखविण्याचे,मराठा समाजातील तरुणांची डोके भडकविण्याचे तसेच दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचे घातक काम करीत असुन त्यातुन सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा सदावर्ते जाणूनबुजून प्रयत्न करीत आहेत.

                   अशा अपप्रवृत्ती व्यक्तीच्या विरोधात सकल मराठा समाज मंगळवेढा तालुका यांच्यावतीने गुन्हा नोंद करणेबाबत निवेदन देण्यात आले तसेच अनेक वाचाळवीर मराठा आरक्षणाच्या विरोधात बेताल वक्तव्य करत आहेत त्यांनी ते नाही थांबवले तर त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.


test banner