घरगुती भाजीपाला लागवड काळाची गरज कृषीतज्ञ अजय आदाटे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

घरगुती भाजीपाला लागवड काळाची गरज कृषीतज्ञ अजय आदाटे.


                   मंगळवेढा:जय जवान गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या घरगुती भाजीपाला लागवाड तंत्रज्ञान या कार्यक्रम प्रसंगी घरगुती भाजीपाला लागवड काळाची गरज आहे .

                   


     असे मत कृषीतज्ञ ॲग्रीकॉस एक्सपोर्टस् कंपनीचे एम.डी.अजय आदाटे यांनी व्यक्त केले जास्तीचे रासायनिक खत व फवारणीचा वापर केल्यामुळे अनेक प्रकारची रोगराई पसरत आहे .त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चात विषमुक्त भाजीपाल्याची लागवड केलेली फायदेशीर ठरणार आहे. त्याची लागवड कशी करावी व निगा कशी राखावी याबद्दलचे सखोल मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केले त्याचबरोबर मंडळाने एक घर एक झाड ही संकल्पना राबवली वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे.

                  त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशावेळी वृक्ष वाटप करून मंडळाने निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


test banner