श्री संत दामाजी महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियान व क्रांती दिन उत्साहात साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियान व क्रांती दिन उत्साहात साजरा.



        मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात दि ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग,सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने मेरी माटी मेरा देश अभियान क्रांती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 


          यावेळी प्राचार्य डॉ एन बी पवार यांनी विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ दिली याप्रसंगी बोलताना प्राचार्य पवार म्हणाले की,आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रदीर्घ असा लढा द्यावा लागला होता.आपणास मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही त्यासाठी अनेक वीर-वीरांगणांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागातून हे स्वातंत्र्य मिळालेले आहे म्हणून मातीला नमन वीरांना वंदन करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. 


            आज आपला भारत देश एक विश्वासपात्र विकसित देश म्हणून पुढे येत आहे.भारताने कोरोना काळात गुणवत्तापूर्ण कोरोना लशीचा जगभर वेळेत पुरवठा करून जगातील अनेक लोकांचे प्राण वाचवले जगातील अनेक देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपला देश महत्त्वाची भूमिका बजावत आहे चंद्रयान मोहीम असेल,दुसऱ्या देशांना अवकाश तंत्रज्ञानात केलेली मदत असेल यामुळे जग आपल्या देशाकडे आशेने पाहत आहे देशाच्या विकासाची घोडदौड वेगाने होत आहे या अभियानात आपण सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करूया असे सांगितले.


             हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभाग प्रमुख प्रा डॉ नवनाथ जगताप, प्रा डॉ दत्तात्रय गायकवाड,प्रा डॉ राजेश गावकरे,डॉ परमेश्वर होनराव,डॉ राजकुमार पवार,डॉ संजय क्षीरसागर,डॉ जावेद तांबोळी,प्रा प्रशांत धनवे,प्राध्यापिका माने यांचेसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


test banner