श्री संत दामाजी महाविद्यालयात पोलीस मुख्यालय येथील पोलीस बॅन्ड पथकाचे संचलन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात पोलीस मुख्यालय येथील पोलीस बॅन्ड पथकाचे संचलन.

               श्री संत दामाजी महाविद्यालयात मंगळवेढा पोलीस ठाणेच्या वतीने माझी माती माझा देश अंतर्गत पोलीस मुख्यालय सोलापूर येथील पोलीस बॅन्ड पथकाने संचलन करून विविध देशभक्तीपर गीतांच्या संगीत धूनमधुन मानवंदना देण्यात आली.


              यावेळी सारे जहाँ से अच्छा,तु मेरा कर्मा तु मेरा धर्मा ऐ वतन तेरे लिये,जय जय महाराष्ट्र माझा, राष्ट्रगीत अशा गीतांच्या संगीतामधुन राष्ट्रप्रेमाची भावना जागी करण्यात आली.


                यावेळी सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ एन बी पवार यांनी प्लास्टिक निर्मुलनाची शपथ दिली तसेच माझी माती माझा देश उपक्रमात विद्यार्थ्यांनी संकलीत केलेली माती नयोमी साटम यांच्याकडे सुपूर्द केली.


               यावेळी संचलनाप्रसंगी आयपीएस अधिकारी नयोमी साटम,पीएसआय धापटे,एएसआय राजेंद्र जावळे,पोलीस हवालदार गेजगे,बॅन्ड प्रमुख मधुकर माने,बुद्धाप्पा जाधव,सुरेश माने,सुरेश कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील,सचिव किसनराव गवळी, प्राचार्य डॉ एन बी पवार, उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह सर्व प्राध्यापक,विद्यीर्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रा विनायक कलुबर्मे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.


test banner