मंगळवेढा(प्रतिनिधी) ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्या -मागील १५ ते २० दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने मंगळवेढा तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी, १०० टक्के नुकसान झाल्यामुळे विम्याची १०० टक्के रक्कम देण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी तहसीलदार सुधाकर धाइंजे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतजमिनीचे व शेतातील खरीप पिकांचे सोयाबीन, ऊस,तुर,मग, व रब्बी हंगामातील ज्वारी,तसेच इतरही पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.द्राक्ष बागा,डाळिंब तसेच इतरही फळ बागांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान प्रचंड झाले आहे. कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ हे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम आहे. पिकले तर त्याला खर्चावर आधारित भाव ही मिळत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी २०२१ रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते.आता स्वतः ते सत्तेत आहेत त्यामुळे त्यांनी तात्काळ सरसकट मदत जाहीर करावी
"परतीच्या पावसानं मंगळवेढा तालुक्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पीकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळणं गरजेचं आहे. पण सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत, यापलीकडे काही केलं जात नाही.ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट ५०००० मदत न दिल्यास जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी संघटनांना सोबत घेऊन तहसील कार्यालया समोर जन आंदोलन उभा करणार असल्याचे मत तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी व्यक्त केलं आहे
यावेळी राजेंद्र सावंत, अमोगसिद्द्ध काकणकी,चेतन वाघमोडे,सुभाष सरगर,नवनाथ शिरसटकर, सर्जेराव गाडे, लखन सर्जे, महेश तळ्ळे,दत्ता पाटील, शशी कोळी,इतर ही कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.