हुन्नूर येथे बिरोबा-महालिंगराया गुरू-शिष्याच्या भेट सोहळा उत्साहात साजरा! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

हुन्नूर येथे बिरोबा-महालिंगराया गुरू-शिष्याच्या भेट सोहळा उत्साहात साजरा!

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) हुन्नुर ता.मंगळवेढा येथील श्री बिरोबा व हुलजंती येथील महालिंगराया यांचा भेटीचा नयनरम्य सोहळा भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघत अनेक भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. कर्नाटक राज्य तसेच सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी या गुरु शिष्य भेटीच्या सोहळ्यास हजेरी लावली होती. श्री बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्यदैवत असल्यामुळे या भेट सोहळ्यासाठी मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्हा आणि सबंध महाराष्ट्रातून धनगर समाजाचे भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.


हुन्नुर येथील श्री बिरोबा हे हुलजंती येथुन महालिंगरायाची पालखी घेऊन धावत पळत भाविक हुन्नुर गावाशेजारील ओढ्यात गुरूच्या भेटीसाठी दाखल झाले होते.  श्री बिरोबा मंदिरातून ढोल ताश्याच्या गजरात वाजतगाजत बिरोबाची पालखी घेऊन भाविक आलेनंतर महालीगरायाची पालखी ओढ्यातून घेऊन भाविक भेटीच्या मैदानावर आले. भेटीच्या मैदानावर गुरु शिष्यांच्या दोन्ही पालख्या आलेनतर सर्वप्रथम बैलाची भेट झाली व त्यानंतर अनेक भाविकांच्या साक्षीने टाळ्याच्या गजरात खोबरे, लोकर, भंडारा आदींची उधळण करत मुक्तपणे भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघत अनेक भाविकांच्या साक्षीने हा गुरु शिष्य भेट नयनरम्य सोहळा पार पडला.


भाविक भक्त पालखीचे स्वागत करतात भेट होताच भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला परत एकदा भंडारा लोकर खोबऱ्याची उधळण करण्यात येते. सर्वांच्या तोंडी बिरोबा महालिंगराया च्या नावानं चांगभलं ऐकायला मिळत होते हा भेटीचा सोहळा वर्षातून एकदा भरत असतो. 

गेल्या दहा दशकापासून गुरु व शिष्याची भेटीची परंपरा चालू आहे यानंतर भाविकांनी देवाला नारळ, भंडारा, पुरण पोळीचा नैवद्य दाखवण्यात आला. 

 

test banner