मंगळवेढा(प्रतिनिधी) माझी जबाबदारी वीज बिल भरायची, माझी जबाबदारी कोरोनामुक्त व्हायची, माझी जबाबदारी सुरक्षित राहायची मग सरकारची जबाबदारी काय? खंडणी वसूल करायची एवढीच का? असा सवाल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
राज्याचे माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील बुधवारी पंढरपूर दौऱ्यावर होते त्यांनी मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर तालुक्यातील शिरढोण, वाखरी, कौठाळी, गादेगाव याठिकाणी झालेल्या सभांना ते उपस्थित होते.
राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीने 163 जागा जिंकल्या, हा कौल युतीच्या बाजूने आणि काँग्रेस-राष्ट्रवादी च्या विरोधात होता पण शिवसेना या दोन पक्षाला जाऊन मिळाला, आणि राज्यात अनैसर्गिक आघाडी झाली, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू असे आश्वासन दिले होते, पण आज हेच सरकार वीज कनेक्शन तोडण्याचे काम करत आहे. दिवसाआड एक मंत्री राजीनामा देतोय, उच्च न्यायालय मंत्र्यांची चौकशी करण्याचा आदेश देतंय, अस कधीच घडलं नव्हतं. महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये, परिवर्तनामध्ये सुरुवात ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीपासून होणार आहे, म्हणून भावनिक होऊ नका , ही निवडणूक विकासाची आहे,मंगळवेढा-पंढरपूरचा विकास करायचा असेल तर समाधान आवताडे यांना विजयी करा.
दीपक भोसले म्हणाले, मागील अकरा वर्ष भालके यांनी लबाडीने काम केले, पोरगा पण कमी नाही, बापानं अर्जुन बँक काढून दिली होती, त्याचे शेअर्स घेतले पण आज बँक कुठे आहे दिसत नाही, बाराला उठायचे टाईमपास करायचा... संपला दिवस, जिल्हा परिषदेला उभारला पण लोकांनी स्वीकारले नाही, पडला आणि आता आमदारकी लढवतोय, बापाच्या वेशात मते मागतोय,सहानुभूती दाखवू नका, विकासाचा दृष्टीकोन ठेवून भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली, कारखाना चांगला चालवणारा, हजारोंना काम देणाऱ्या आवताडे यांना विजयी करा असे आवाहन केले. या दौऱ्यात विधान परिषद आ.प्रशांत परिचारक,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे,सभापती अर्चना व्हरगर,उपसभापती राजश्री पंडितराव भोसले,गादेगाव सरपंच ज्योतीताई बाबर, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे ,जिल्हा परिषद सदस्य,पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब गोसावी,भाजप नेते बी.पी.रोंगे,बाळासाहेब देशमुख,पांडुरंग संचालक सुरेश आगवणे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली हळणवर,दाजी पाटील,व त्या त्या गावचे पाटील, सरपंच, चेअरमन व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.