हॉटेल अॅम्बेसिडर ने पटकावला स्वच्छ सर्वेक्षणातील प्रथम पुरस्कार - सांगोला नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२१ - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

बुधवार, १६ डिसेंबर, २०२०

हॉटेल अॅम्बेसिडर ने पटकावला स्वच्छ सर्वेक्षणातील प्रथम पुरस्कार - सांगोला नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२१

 

सांगोला - टिम संवाद न्यूज 

सांगोला शहरात आणि परिसरात लोकप्रिय असलेल्या हॉटेल अॅम्बेसिडर ने आणखी एक मानाचा तूरा शेरपेचात लावला आहे. " स्वच्छ सर्वेक्षण २०२१" आणि "माझी वसुधरा अभियान" अंतर्गत ,सांगोले नगरपरिषदेच्या मार्फत शहरात राबवलेल्या
"स्वच्छ हॉटेल" या स्पर्धेमध्ये हॉटेल अॅम्बेसिडर सांगोला ची प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हॉटेल व्यवसायात सतत नविण्याची जोड देत उत्कृष्ठ सेवा आणि क्वालिटी याची सांगड घालत सांगोलकरांच्या मनात हक्काचं घर केल आहे. स्वच्छता, टापटीप पणा आणि विनम्र सेवा यामुळे कुटुंबासोबतचा आनंदाचा क्षण साजरे करण्यासाठीचे हक्काचे ठिकाण बनले आहे.

" ग्राहकाला विनम्र व तत्पर सेवा देवून त्यांचे पूर्ण समाधान देण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टिम काम करत असतो, त्यात असा स्वच्छ तेचा प्रथम पुरस्कार मिळणे म्हणजे आमच्या कामाचे चीज झाले आहे असेच वाटते " असे मत हॉटेलचे मालक श्री. विश्वास जाधव यांनी बोलताना व्यक्त केले


सांगोला पं.समीतीच्या सभापती सौ.राणीताई कोळवले यांनी हॉटेल अॅम्बेसडर सांगोला मध्ये भेट देवून सांगोला नगरपरिषदेच्या मार्फत आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल श्री .विश्वास जाधव यांचा सत्कार केला.अनं भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सांगोला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा