पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांतून कॉग्रेसचे शिवाजी काळुंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांतून कॉग्रेसचे शिवाजी काळुंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला


मंगळवेढा (प्रतिनिधी)कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जागा वाटपाच्या घोळातुन काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवरी रात्री अचानक जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतील पंढरपूर मतदारसंघांतून शिवाजीराव काळुंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
       आघाडीच्या जागावाटपात 2009 पर्यंत  पंढरपुर जागाही राष्ट्रवादी काँग्रेस होती पण रिडालोस मधून विजयी झालेले आ. भारत भालके यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे ही जागा कॉंग्रेसला देऊ केली आ. भालके पुन्हा विजयी झाले परंतु त्यांच्या विजयात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान ठरले आहे परंतु पाच वर्षांच्या काळामध्ये काँग्रेस मधील काही कार्यकर्त्यांनी आ.भालके यांच्यापासून अंतरावर राहिले काँग्रेस पक्षाचे संघर्ष यात्रेत ही गटबाजी अधिक प्रमाणात  दिसून आली  परंतु ही गटबाजी रोखण्याच्या दृष्टीने माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही उलट गटबाजीला खतपाणी घालण्याचे प्रयत्न केले.असा आरोप आ भालके समर्थकांनी केला अशा परिस्थितीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या प्रचारात एकही वक्ता न येता प्रचाराची जबाबदारी आ. भालके यांनी पार पाडली. सत्ताधारी पक्षाच्या निष्क्रिय कामावर प्रहार केल्यामुळे पंढरपूर मतदारसंघातून साडेसात हजार दिले परंतु शिंदे समर्थक काॅग्रेस कार्यकर्ते सुशीलकुमार शिंदे वगळता इतर कोणत्याही वेळी काँग्रेस बरोबर नसल्याचे दिसून येत होते . यांत आ.भालकेची काँग्रेस पक्ष सोडण्याची मानसिकता तयार होत गेली. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला  उमेदवारी आज अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेस पक्षाने या यादीत शिवाजीराव काळुंगे यांचे नाव जाहीर झाले केले.
आघाडीतील जागावाटपाचा घोळ पंढरपुरातून उघड झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळायचा की नाही असे संकट काँग्रेसच्या नेत्यांनी आणून ठेवले आहे यावर काय तोडगा निघतो निघतो की आघाडीत बिघाडी होते याकडे लक्ष लागले आहे
test banner