मंगळवेढा (प्रतिनिधी )शिवसेना-भाजपा युतीने केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्रामध्ये विरोधीपक्षच शिल्लक राहिला नसल्याने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही थकलो असून दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याचा दिलेला सल्ला योग्य दिल असून महायुती सत्तेच्या दुसऱ्या पर्वात दुष्काळमुक्त महाराष्ट्र संकल्पना घेतली असल्याचे परिचारकाच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुतोवाच केले .
शिवसेना-भाजप-रयत क्रांती रिपाई महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते पाटील, आ. प्रशांत परिचारक, सुधाकरपंत परिचारक, शहाजीबापू पाटील ,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा,उमेश परिचारक,भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,कल्याणराव काळे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत,जिल्हा नियोजन समितीचे अजित जगताप,शशिकांत चव्हाण,पंढरपूरच्या नगराध्याक्षा साधना भोसले,औदुंबर वाडदेकर,चंद्रशेखर कौडुभैरी,चरणुकाका पाटील,गौरीशंकर बुरकुल,संतोष मोगले,मधुकर चव्हाण बिरूदेव घोगरे,सुभाष गोडसे,सुरेश जोशी आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्ष असलेल्या आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला करत ते सरकार पुन्हा निवडून येणार नसल्यामुळे सध्याच्या निवडणुकीत जे आश्वासन पूर्ण करता येत नाही असे आश्वासन देऊन मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांच्या आश्वासनाला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही.माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेला सल्ला हा विरोधीपक्ष मिळवण्यासाठी उपयोग असल्याने दोन्ही काँग्रेस एकत्र आले तरी इतक्या जागा येणार नाहीत त्यामुळे त्यांची विरोधीपक्ष मिळवण्यासाठी स्पर्धा होणार आहे शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने पाच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे मतदार पुन्हा आमच्या पाठीशी उभा राहणार आहे. गेल्या ५ वर्षात ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, दुष्काळ निधी, अतिवृष्टी मदत, ट्रॅक्टर साठी अनुदान, जनावरांसाठी छावण्या,उपचारासाठी मदत केली याशिवाय अन्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली आहे जलयुक्त शिवार च्या माध्यमातून जलसंधारणाचे काम देखील चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात झाले आहे. सांगली, सातारा ,कोल्हापूर या भागातील पूर परिस्थिती आणि समुद्राला जाणारे पाणी वळवून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला देण्याच्या दृष्टीने आमचे सरकार गंभीर असून या पुढील काळात दुष्काळ मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबवताना या सरकारमध्ये सरकारचे प्रतिनिधी करणारा प्रतिनिधी या भागातील असावा म्हणून संतनगरीतून संत असलेल्या सुधाकरपंत परिचारक यांना संधी दिली आहे. म्हणून आपण त्यांना विजय करून विधानसभेत पाठवावे या भागातील प्रश्नासाठी शिवसेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून केलेल्या प्रश्नाला न्याय दिला जाईल.सभेचे सुत्रसंचालन भारत मुढे तर आभार जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर यांनी मानले