अंधारमय मतदारसंघाला प्रकाशाकडे नेण्यासाठी जनतेरुपी निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलो - प्रा. शिवाजीराव काळुंगे मंगळवेढा येथे पदयात्रेला व सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

अंधारमय मतदारसंघाला प्रकाशाकडे नेण्यासाठी जनतेरुपी निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलो - प्रा. शिवाजीराव काळुंगे मंगळवेढा येथे पदयात्रेला व सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसादमंगळवेढा (प्रतिनिधी) - पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघ हा गेली दहा वर्षे अंधारमयात होता. त्याला प्रकाशाकडे नेण्यासाठी या निवडणुकीत सर्वसामान नेतृत्व व्हावे म्हणून उतरलो आहे. त्यासाठी मतदारांचे आपल्याला चांगले पाठबळ मिळेल असा आशावाद प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केला आहे.
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे पदयात्रा व जाहीर सभा आयोजित केली होती याप्रसंगी प्रा.काळुंगे बोलत होते.
व्यासपीठावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम सावंत, सीए सदानंद हजारे, नंदेश्वरचे माजी सरपंच वसंत गरंडे, मुबारक शेख, डॉ. भीमाशंकर बिराजदार, माजी नगराध्यक्ष बाबूभाई माकनदार, अविनाश चव्हाण, पांडुरंग सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किसन सावंजी, प्रभाकर कलूबर्मे, माचणूर माजी सरपंच बबन सरवळे, मारुती काळुंगे, तळसंगी ग्रा.पं.सदस्य जगन्नाथ गोरड, सोमन्ना सांगोलकर गुरुजी, येड्रावचे अंकुश माने, मरवडेचे माजी उपसरपंच रजाकभाई मुजावर, परमेश्वर घुले, उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, आजवर हा मतदारसंघ लोकप्रतिनिधीच्या गटातटाच्या राजकारणामुळे विकासापासून कोसो दूर राहिला आहे. आता अशा राज्यकर्त्याना बाजूला हटवून माझ्यासारख्या सर्वसामान नेतृत्व करणाऱ्याला संधी देण्यासाठी जनता नक्कीच मताच्या रूपाने पाठबळ देईल. आजवर एक सच्चा कार्यकर्ता म्हणून गेली 52 वर्षे एकाच काँग्रेसच्या झेंड्याखाली काम करीत आहे. याचेच फळ म्हणून काँग्रेसच्या हायकमांडमधील आपले नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघावर काँग्रेसचा हक्क आसताना या अगोदरच्या लोकप्रतिनिधीनी काँग्रेसच्या तिकीटला लाथाडले आणि मित्रपक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने आपल्याला उमेदवारी दिली आहे. आपली उमेदवारी पक्षमार्फत आहे यावर विरोधाकानी केलेली अफवा ही किळसवाणाचा प्रकार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 वर्षे मंगळवेढा तालुक्याचा काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. या काळात सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात अनेक विकास कामे केली. यामध्ये सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अरळी बंधारा मंजुरी साठी तसेच पौट तलावासाठी सही केली. त्यामधून अरळी बंधारा आज पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याभागाचे आज नंदनवन आहे. पौट तलाव मात्र काही स्थानिक अडचणीमुळे पौट तलाव पूर्ण झाला नाही. मंगळवेढा येथे दामाजी चौकात नवीन पोस्ट ऑफिस इमारत, साठे नगर मधील दूरदर्शन केंद्र त्याबरोबर ग्रामीण भागात सभागृह बांधणे, अनेक माध्यमिक शाळेच्या इमारती बांधण्यासाठी मदत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक रस्ते मंजूर करून घेतले आहे.
1993 सालापासून स्व. क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांचे नेतृत्वाखाली आ. भाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळी तालुक्याची पाणी संघर्ष चळवळ उभी राहिली. तिचा गेली 27 वर्ष मंगळवेढा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. या पाणी संघर्ष चळवळीच्या रेट्यामुळे म्हैसाळचे पाणी हुन्नूरच्या ओढ्यात ट्रायल स्वरुपात आले. ते नियमित पाणी यावे, मंगळवेढा तालुक्यातील उजनीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून तालुक्यातील सुमारे ९० हजार एकराकरिता साडेसहा टी एम सी पाणी मंजूर असतानाही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचले नाही. त्यामुळे उजनीची अपूर्ण कामे पूर्ण करणे, कॅनॉलसाठी अधिग्रहण केलेल्या जमीनधारकांना त्या क्षेत्राचा अद्याप न मिळालेला मोबदला मिळवून देऊन कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे, ३५ गावासाठी असणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस निधी मिळवून योजना पूर्ण करणे, भीमा व माण नदीला कॅनॉलचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणे, दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन करणे,
मंगळवेढा येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी असल्याने याठिकाणी श्री बसवेश्वर यांचे यथोचित स्मारक करण्यासाठीचे प्रयत्न, तसेच
मंगळवेढा हे संताची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच या ठिकाणी श्रीसंत दामाजीपंत, श्री. संत चोखोबा यांची समाधी आहे. अशा अनेक महान संतांच्या गौरवाचा इतिहास लाभलेल्या या मंगळवेढा शहराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु अद्यापही या संतांच्या पावनभूमीची उपेक्षा करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवेढा येथे सर्व संतांचे यथोचित स्मारक स्थापन करण्यासाठीचे प्रयत्न, पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आजवर उभा राहू शकली नाही. याबाबत बेरोजगार युवकांच्या हाती काम देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पंढरपूरात स्थापना करणे यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. एक प्रामाणिकपणाची साक्ष देण्यासाठी आपण निवडणुकीत उतरलो आहे. मात्र काही अल्पसंतुष्टनानी आपल्याबाबतीत किळसवाणे अफवा पसरवल्या होत्या. मात्र त्यांना काही यश आले नाही. या निवडणुकीतसुद्धा त्यांना यश मिळणार नाही. हे निश्चित झाले आहे. आपल्याला संधी मिळाल्यास पुढील पाच वर्षे जनतेशी प्रमाणिक राहून काम करीत राहीन असे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी यावेळी सांगितले.
सभेचे प्रास्ताविक मुबारक शेख यांनी केले. याप्रसंगी रजाकभाई मुजावर, डॉ. भीमाशंकर बिराजदार, राजाराम सावंत, डॉ.राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड, अक्षय टोमके, शिवाजी काळे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी केले तर आभार प्रकाश काळुंगे यांनी मानले.
मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी, समर्थक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ,मंगळवेढा व पंढरपूर शहर,तालुक्यातील अनेक मान्यवर , मतदार बंधू-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.


चौकट - *पदयात्रेला युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या प्राचारार्थ मंगळवेढा शहरात पारंपरिक हलगीच्या तालावर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. ही पदयात्रा सकाळी 11.00 वा. दामाजी चौकातून श्री. संत दामाजीच्या पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर पुढे शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक, शनिवार पेठ, मेटकरी गल्ली, किल्ला भाग या मार्गावरून निघून मारुतीच्या पटांगणात या पदयात्रेचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी मतदारांनी काँग्रेसचे गळ्यात उपरणे घालून हातात झेंडे घेऊन काळुंगे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है | तसेच काँग्रेस पक्षाचा विजयी असो आशा घोषणा देत ही पदयात्रा मोठ्या जयघोषात निघाली.
test banner