पंढरपुरात 'मतां'च्या दरापेक्षा वांग्याच्या 'दरा'ची चर्चा अधिक! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

पंढरपुरात 'मतां'च्या दरापेक्षा वांग्याच्या 'दरा'ची चर्चा अधिक!

       
निवडणुकीच्या रणधुमाळीत मताला काय भाव पडला याचीच चर्चा असते पण पंढरपूर मध्ये मात्र 'वांग्या'ला मिळालेल्या दराची चर्चा गावागावात सुरू आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावात 15 किलो वांग्याच्या केरेटला 1700 दर मिळाला आहे. 113 रुपये किलो या उच्चांकी दरामुळे मतांच्या दरापेक्षा वांग्याचा दर भाव खाऊन गेला आहे.                                                                    गुरसाळे येथील शेतकरी शरद पाटील बाजार समितीत आपली वांगी विक्रीसाठी घेऊन आले होते. पाटील यांच्या वांग्याला 1700 दर मिळाला म्हणजे साधारणपणे 113 रुपये किलो इतका होलसेल भाव मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून मताला काय भाव पडेल याची चर्चा तालुक्यात होती मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या वाढत्या दराची चर्चा अधिक होते आहे. दर वाढल्याने शेतकरी खुश असले तरी ग्राहक मात्र चिंत्तीत आहेत.                                                                     दर वाढण्यामागची कारणे जाणून घेतली असता भाजी अडत व्यापारी मकसूद बागवान यांनी सांगितले की, 'पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे भाज्यांवर रोगराई पसरली आहे. निम्म्याहून अधिक भाजी किडली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आवक कमी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.'
test banner