भालके सारख्या लबाड माणसाने आपल्याला काय दिलं याचा विचार करण्याची संधी आली आहे -लक्ष्मणराव ढोबळे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

भालके सारख्या लबाड माणसाने आपल्याला काय दिलं याचा विचार करण्याची संधी आली आहे -लक्ष्मणराव ढोबळे

     
                                                                          मंगळवेढा (प्रतिनिधी) भालके सारख्या लबाड माणसाने आपल्याला काय दिलं याचा विचार करण्याची संधी आली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.         
ते महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ रड्डे येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

प्रा.ढोबळे पुढे बोलताना म्हणाले की,  मतदार बंधूंनो सध्या देशामध्ये आणि राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागातील लोकप्रतिनिधी हा सत्तेतील पक्षाचा असला पाहिजे.जर वाढप्या आपला ओळखीचा असला तरच आपल्याला पोटभर खायला मिळेल.

माझी 35 गावं गेल्या अनेक वर्षापासून तहानलेली आहेत त्यांना पाणी देण्यासाठी आणि या भागाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना व मित्र पक्ष या महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देण्याची गरज आहे. मागील दहा वर्षांमध्ये आपण ज्या लबाड आमदारावर विश्वास ठेवून  निवडून दिलं त्याला आता आपण  आमच्यासाठी काय दिलं हे विचारण्याची वेळ आलेली आहे.आजपर्यंत खोटे आश्वासने यापेक्षा आमच्या पदरी काहीही पडलं नाही.आम्ही आता तुम्हास ओळखले आहे म्हणून येत्या दिवाळीला आपल्याला गडी बदलण्याचा विचार करावा लागेल.


जो काम करेल त्यालाच आपण निवडून द्यायचे आहे. पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून आणि पंचवीस वर्ष आमदार पद सांभाळलं त्या सुधाकरपंतांना मत द्या म्हणून सांगण्यासाठी मी आपल्यासमोर बोलतो आहे.मला त्यांच्या कामा वरती विश्वास आहे.निष्कलंक,चारित्र्यवान नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचा परिचय आपणा सर्वांना माहित आहे. भालके सारख्या लबाड माणसाने आपल्याला काय दिलं याचा विचार करण्याची वेळ आता आपल्यावर येऊन ठेपली आहे.गड्यांनो ही संधी सोडू नका आपल्याला भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे.दर दिवाळीला आपण गडी बदलतो. काम करत नसलेला गड्याला घरी पाठवतो. त्याच पद्धतीने आता भालकेला घरी पाठवा आणि या भागाचा विकास करण्यासाठी विकास प्रिय नेतृत्व म्हणून या तालुक्याची सूत्रे सुधाकरपंत परिचारक यांच्याकडे सोपवा. मला मागील अनेक वर्षांचा त्यांच्या कामाचा अनुभव माहित आहे. ड्रायव्हरने गाडी व्यवस्थित चालवली तर गाडीतील प्रवासी सुखरूप राहतात.आज परिचारक साहेबांच्या सर्व संस्था या नावारूपाला आलेल्या संस्था म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत.


ज्या नेतृत्वाला आपण दहा वर्षे सत्ता दिली त्या भालके यांनी कोणत्या संस्था जोपासल्या ? गेल्या अनेक महिन्यांपासून साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा पगार नाही.त्यांच्या घरी आलेल्या अडीअडचणी कोण सोडवणार ?त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था कोण करणार ?त्यांच्या माता-पित्यांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी रक्कम कोण देणार,त्यांना सावकाराचे उंबरे झिजवायला लावणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करीत ढोबळे सर यांनी या सर्वांना संबोधित करीत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये ही वेळ वाया घालवू नका बंधूंनो ही वेळ जर चुकली तर आपल्या अनेक पिढ्या वाया जातील याही गोष्टीचा विचार करा आणि पंढरीच्या पांडुरंगा ला विधानसभेत पाठवण्यासाठी येत्या 21 तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून सुधाकरपंत परिचारक यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन प्रा.ढोबळे यांनी केले.

प्रसंगी रयत क्रांतीचे राज्याचे नेते दीपक भोसले,बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते माऊली हळवणकर, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने सर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपुरचे माजी सभापती दाजी भुसनर आदी मान्यवर व रड्डे तसेच परिसरातील मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.
test banner