आजपर्यंत नेहमीच पाठीशी राहिलात यापुढेही मायेची थाप रहावी : समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

आजपर्यंत नेहमीच पाठीशी राहिलात यापुढेही मायेची थाप रहावी : समाधान आवताडे



मंगळवेढा(प्रतिनिधी) दामाजी कारखाना,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या माध्यमातून आपण सर्व मतदार नेहमीच माझ्या पाठीशी राहिलात,माझ्यावर जेष्ठांनी मुलासारखे,तरुणांनी भावासारखे प्रेम केले आहे, आपण टाकलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जावू देणार नाही जसा विश्वास आतापर्यंत माझ्यावर टाकलात तसाच विश्वास यावेळी विधानसभेत पाठविण्यासाठी दाखवा त्या विश्वासास मी पत्र राहीन असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले .                              मंगळवेढा येथे आयोजीत भव्य प्रचार सभेत ते बोलत होते.
  पुढे बोलताना आवताडे म्हणाले की, गेली २५ वर्षापासून या मतदारसंघाचा विकास खुंटलेला आहे. मतदारसंघाला कुणी वाली नाही. एक मागासलेला मतदारसंघ म्हणून आपली ओळख झाली आहे. आणि याला जबाबदार आहेत लोकप्रतिनिधी. पाण्याचे राजकारण करुन सत्तेची पोळी भाजण्यातच आमदारकी पणाला लावण्याचे काम झाले आहे. आपल्या हक्काचा ४.६७ टक्के टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तो का मिळत नाही. काय करतात लोकप्रतिनिधी असा प्रश्न जनतेला पडला आहे. सत्तेचा वापर राजकारणसाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी करायचा असतो हे शिकविण्याची वेळ आली आहे. सतत पडणा-या दुष्काळामुळे तालुक्यात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरु होतात. ही भुषणावह बाब नाही. योग्य नियोजन करुन छावणीमुक्त व टँकरमुक्त मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख करुन देणार आहे. म्हैसाळ टप्प्याबाबत बोलायचे झाल्यास कामे अपूर्ण असल्याने पाणी येत नाही. म्हैसाळ योजणेतून कांही गांवे वगळल्याचेही लोकप्रतिनिधींना माहिती होत नाही. यासाठी जनतेला आंदोलने करुन त्यांना जाग आणावी लागली. आणि नतर बैठकांचे सत्र घेण्याचा नाटकीपणा करुन पेपरबाजी केली. म्हैसाळ योजणेची सर्व कामे वेळेत पूर्ण झाली असती तर अनेक बंधारे,तळी भरुन जनतेला याचा फायदा झाला असता. माण नदी काठचा असो अथवा भिमा नदीकाठचा प्रश्न असो, परिस्थिती गंभीर आहे. मंगळवेढा एमआयडीसी मध्ये सौर उर्जा प्रकल्प आणून इथल्या उद्योजकांवर अन्याय केला गेला. बेरोजगारांची निर्माण होणारी संधी वाया घालविली. कतृत्वशुन्य, नियोजनशुन्य लोकप्रतिनिधीमुळेच हे झाले आहे.
दामाजी कारखान्याची सत्ता हाती आल्यापासून सतत दुष्काळ आहे, तरीही कुठली कारणे न सांगता कारखान्याला अगोदरच्या लोकांनी पाडलेली भुयारे बुजवत सभासदांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत आलो आहे. या मतदारसंघातला बेरोजगारीचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, परंतु याकडे कुणी लक्ष दिले नाही. या युवकांना मला उभे करायचे आहे, त्यांना ताकद देण्याचे काम मी करणार आहे. पंढरपूर शहर व तालुकाही समस्याच्या विळख्यात आहे. शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास होणे शक्य होते. परंतु तसे झाले नाही. पंढरपूर तालुक्यातही पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत. पाणी नियोजन समितीवर असूनही लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक झाली. या निवडणूकीच्या रिंगणात आणखी एक उमेदवार आहेत, वयाचा परिणाम शेवटी काम करण्याच्या कार्यक्षमतेवर होत असतो. अशा व्यक्तीला निवडून देवून विकास होणार नाही. मतदारसंघातील असे अनेक प्रश्न आहेत, जे आजपर्यंत सुटलेले नाहीत. किती दिवस जनतेने हे सोसायचे आहे. यासाठीच मतदारसंघाचे हे चित्र बदलण्यासाठी संधी द्या व मला विजयी करा अशी साद मी तुम्हाला घालीत आहे आणि आपण निश्चीतच साथ द्याल ही खात्री बाळगतो असे शेवटी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना नेते प्रा.येताळा भगर सर, भाजपाचे शिक्षक सेल उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे,खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे, रासपा चे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब मेटकरी, पंढरपूरचे युवा नेते अमरजीत पाटील,प्रा.समाधान क्षिरसागर, अँड. दत्तात्रय तोडकरी,युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष युवराज शिंदे,दत्तात्रय ताड आदिनीही आपले मनोगत व्यक्त करुन उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. स्वागत व प्रास्तावीक दिगंबर यादव यांनी केले.
सदर प्रसंगी डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष व जेष्ठ नेते बबनराव आवताडे, जि.परिषद समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, सदस्य दिलीप चव्हाण, सदस्या मंजुळा कोळेकर,पंचायत समितीचे सभापती प्रदिप खांडेकर, मार्केट कमेटीचे सभापती सोमनाथ आवताडे,  दामाजी मंदिर संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे, विठठल कारखान्याचे मा.संचालक शेखरभाऊ भोसले, पंचायत समिती उपसभापाती विमल पाटील,सदस्या उज्वला मस्के, पे्ररणा मासाळ, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, अनिल बोदाडे, दिपक माने, नगरसेवीका रतन पडवळे, मा.उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे, लक्ष्मण जगताप,सचिन शिवशरण,राजेंद्र पाटील,राजीव बाबर, भुजंगराव आसबे, शिवयोग्याप्पा पुजारी, पप्पू काकेकर, विजय माने, संजय पवार, सुरेश भाकरे, बाळासाहेब शिंदे, मारुती थोरबोले, लक्ष्मण नरुटे,रामकृष्ण चव्हाण, बसवेश्वर पाटील,भारत निकम, सौ.अंजली आवताडे, संचालिका स्मिता म्हमाणे, कविता निकम , डॉ.वृषाली पाटील,शिवाजी पटाप,  विनोद लटके, पंढरपूर शहर बीएसपी चे अध्यक्ष सुरेश माने, सुभाष चौगुले, बाळू होवाळे, तसेच खरेदी विक्री संघ, मार्केट कमेटीचे संचालक मंडळ, दामाजीनगर,चोखामेळानगर ग्रामपंचायतचे पदाधिकारी, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी ,मान्यवर,समर्थक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन व सदस्य, मंगळवेढा व पंढरपूर शहर,तालुक्यातील अनेक मान्यवर , मतदार बंधू-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच या सभेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सभेचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले. तर आभार प्रहार अपंग संघटणेचे अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी मानले.
test banner