सेवानिवृत्त लष्करी जवानांच्या हस्ते ग्रामस्थांनी आमदार भारतनाना भालकेंना दिला निवडणूक निधी - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

सेवानिवृत्त लष्करी जवानांच्या हस्ते ग्रामस्थांनी आमदार भारतनाना भालकेंना दिला निवडणूक निधी



प्रतीनिधी : मंगळवेढा तालुक्यातील आ.भारतनाना भालकेंच्या प्रचार दौर्‍यात माचनूर ग्रामस्थांनी आणि सेवानिवृत्त लष्करी जवानांनी रोख ५१,०००  रुपये निवडणूक निधीसाठी मदत केली.
जनतेतून मोठ्या प्रमाणात भारतनाना भालकेंबद्दल आपुलकीची लाट तयार होताना दिसत आहे.  एकीकडे पैसे देवून आणलेली गर्दी आणि दुसरीकडे लोकवर्गणी गोळा करून दिलेला निधी ही सध्याच्या युगात सामान्य घटना असूच शकत नाही.नेत्याला अडचणीत आणून पैसा मिळवणारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रत्येक नेत्याच्या भोवती फिरत असताना आमदार भालकेंनी लोकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे याची ही पोहोच पावतीच म्हणावी लागेल कारण हे काही एका गावात घडले असे नाही.


दौर्‍याच्या सुरवातीला ढवळस गावात ग्रामस्थांच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलाला तिसऱ्यादां विधानसभेत पाठवण्यासाठी निवडणूक निधी म्हणून रोख ११,०००  देण्यात आले.


तसेच बठाण ग्रामस्थांच्या वतीने निवडणूक निधी म्हणून रोख १५,५०० रुपये देण्यात आले


आणि मुंढेवाडी ग्रामस्थांच्या वतीने निवडणूक निधी रोख २१,००० रुपये दिले .
उचेठाण ग्रामस्थांनी सुद्धा आमदार साहेबांना निवडणूक निधी रोख ११,००० रुपये दिले.  
तसेच ब्रम्हपुरी ग्रामस्थांनी लाडक्या नेत्याला परत विधानसभेत पाठवण्यासाठी निवडणूक निधी १०,०००  रुपये देवू केले. 

या दौर्‍यात प्रत्येक गावातून आमदार भारतनाना भालकेंविषयी प्रेम व्यक्त करणारे, नानाच आमदार पाहिजे , हक्काचा माणूस, दिलदार माणूस,शेतकर्‍याचा कैवारी  अश्या वाक्यांनी स्थानिक नेते आणि ग्रामस्थ नानाच कौतुक करताना दिसत आहेत. 
मंगळवेढा ग्रामीण भागात आमदार भारतनानांना मिळणारा हा प्रतिसाद राष्ट्रवादी कॉंग्रेसला जुने दिवस आठवणीत आणणाराच ठरत आहे यात शंका नाही. 

test banner