म्हैसाळ योजनेतील मंगळवेढा तालुक्यातील पाच गावांचा नव्याने समावेश आमदार प्रशांत परिचारक यांची पत्रकार परिषदेत माहिती - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

म्हैसाळ योजनेतील मंगळवेढा तालुक्यातील पाच गावांचा नव्याने समावेश आमदार प्रशांत परिचारक यांची पत्रकार परिषदेत माहिती


मंगळवेढा(प्रतिनिधी )म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत मंगळवेढा तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील आसबेवाडी, शिवणगी, लवंगी, येळगी व सोड्डी या गावांचा नव्याने समावेश करण्यात आला असून कायमस्वरूपी दुष्काळात असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाने दिलासा मिळणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा येथे पत्रकार परिषदेत दिली. मंगळवेढा येथील पंढरपुर अर्बन बँकेत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत नव्याने समाविष्ट करण्यासाठी प्रशासकीय पत्र मिळाल्यानंतर आ.परिचारक यांनी त्याबाबत माहिती दिली.
यावेळी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर,शिवाजी नागणे, युन्नुस शेख, अरूण किल्लेदार,रामकृष्ण नागणे, नामदेव जानकर, सुनील कांबळे, प्यारेलाल सुतार, मधुकर चव्हाण, मानवानंद आकळे, लक्ष्मण पांढरे आदी उपस्थित होते.
कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्‍हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अकृषिक व इतर कारणामुळे कमी होणार्‍या क्षेत्राच्या बदल्यात प्रस्तावित क्षेत्राला पाणी देणे शक्य होणार असल्याने मंगळवेढा तालुक्यातील असबेवाडी , शिवनगी , लवंगी , येळगी व सोड्डी या गावांतील ७७४ हे . इतके क्षेत्र कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत शासनाची तत्वत : मान्यता देण्यात आल्याचे आमदार परिचारक यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा