शालेय खो-खो स्पर्धेमध्ये जुनोनी माध्यमिक विद्यालय,जुनोनी संघास विजेतेपद - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

शालेय खो-खो स्पर्धेमध्ये जुनोनी माध्यमिक विद्यालय,जुनोनी संघास विजेतेपद


     मंगळवेढा (प्रतिंनिधी)दि.२१/०९/२०१९ रोजी न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे पार पडलेल्या शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षे वयोगटामध्ये जुनोनी माध्यमिक विद्यालय जुनोनी संघाने सेमी फायनल सामन्यामध्ये लवंगी संघाचा १ डाव २ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना हा जुनोनी माध्यमिक विद्यालय, जुनोनी विरुद्ध बाळकृष्ण विद्यालय, भाळवणी या अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये पहिल्या डावात जुनोनी संघाने भाळवणी संघावर १० गुणांची आघाडी घेतली. यामध्ये जुनोनी संघाचे खेळाडू कु.विद्या मेटकरी हिने तडफदार ४ मिनिटे ३० सेकंद संरक्षण करीत सिंहाचा वाटा उचलला. तसेच कु.भाग्यश्री भोसले, जयश्री मेटकरी, गायत्री जाधव, यांनी महत्वाची कामगिरी करीत जुनोनी संघाने बाळकृष्ण विद्यालय, भाळवणी संघाचा ४ गुणांनी पराभव करीत सामन्यात वर्चस्व मिळविले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक व युटोपियन शुगर्सचे (स्टोअर अकौंटंट) श्री.सुनिल पुजारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे क्रीडा शिक्षक- श्री. बंडगर सर, मार्गदर्शक श्री.पाच्छापुरकर सर, श्री. पवार सर यांचेसह प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सिद्धेश्वर इंगोले सर व जुनोनी ग्रामस्थांनी अभिनंदन केले
test banner