मंगळवेढ्यात स्वाभिमानीने लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढ्यात स्वाभिमानीने लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले



मंगळवेढा(/प्रतिनिधी)मंगळवेढा तालुक्याला रब्बीचा दुष्काळ निधी व पिक विमा, खरीप तुर पिकाचा  विमा देत असताना केलेला दुटप्पीपणा, पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ मिळावे.  फॅबटेक व दामाजी कारखान्यांनी थकित ऊस बिलाची रक्कम तात्काळ मिळावी. या मागण्यासाठी तीन दिवसापासून सुरू असलेले उपोषण तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या लेखी आश्वासनानंतर सोडण्यात आले.
 या अश्वासनामध्ये तहसीलदारांनी दामाजी कारखाना व फबटेक कारखान्याच्या थकीत बिल साखर निर्यात अनुदान मिळाल्यानंतर तात्काळ देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे त्याचबरोबर रब्बी दुष्काळ निधीची जिल्हाधिकारीयांच्याकडे मागणी केली आहे रखंडलेला विमा वीस दिवसात देण्यात येईल अशी मुद्देसूद लेखी आश्वासने दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आल्याचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष  ऍड.राहुल घुले, तालुका अध्यक्ष श्रीमंत केदार,यांनी सांगितले.यावेळी शंकर संगशेट्टी, रावसाहेब चौगले,महादेव येडगे, शिवा स्वामी,अनिल बिराजदार,आबा खांडेकर,श्रीकांत पाटील,राजेंद्र राणे, विजयकुमार पाटील, पांडुरंग बाबर, रोहित भोसले, मोहन बुद्दालकर, राजकुमार भरमगोंडे, दत्तात्रेय मांडवे, संजय आळगे, काशिनाथ संघशेट्टी, संभाजी नरोटे, काशिनाथ बिराजदार, परमेश्वर येणपे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
 फोटो- उपोषण कर्त्याना लेखी आश्वासन देताना तहसीलदार स्वप्नील रावडे.
test banner