पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अँड आय.सी.एम.एस कॉलेजला भेट देऊन त्यांनी या ठिकाणी एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आणि अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
यावेळी अग्निशामन दलाचे डायरेक्टर जी.एम.दिवटे यांनी माहिती देताना सांगितले की, ‘ या अग्निशामक दलाची स्थापना १.एप्रिल इ.स १८८७ रोजी झाली असून हे दल आग विझवण्याबरोबरच, इमारत कोसळणे, वायुगळती,तेलगळती, इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम देखील करते,’ या मार्गदर्शन शिबिरात वय वर्ष १८च्या पुढील विद्यार्थ्यांचा समावेश करून घेण्यात आला होता. तसेच महिलांनी घरात स्वयंपाक करीत असताना गॅस सिलेंडर लिकेज झाला तर घाबरून न जाता त्यांनी अशा वेळी नेमकी कोणती उपाययोजना करावी? याची माहिती दिली. तसेच पुढे ते म्हणाले ‘आम्ही या उपक्रमांतर्गत काही निवडक स्वयंसेवकांना ‘अग्निशमन मित्र’ म्हणून प्रशिक्षण दिले आहे. हे मित्र आगीच्या ठिकाणी पोहोचून गर्दीवर नियंत्रण मिळवणे,आगीपासून नागरिकांचा बचाव करणे, आपत्कालीन मदत पुरवण्यासाठी सहकार्य करतील,अग्निशमन दलाकडे जवानांची कमतरता असल्याने आम्ही कॉलेजच्या विद्यार्थी व तरुणांना हे प्रशिक्षण देत आहोत. पंढरपूर तालुक्यातील प्रशिक्षण देण्याचा पहिला मान लोटस इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि आय सी एम एस कॉलेजचा आहे तसेच यावेळी डॉ.हाके यांनी एखाद्या ठिकाणी आग लागल्यामुळे नागरिक जखमी झाले तर त्यांना कोणते प्रथमोपचार द्यावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अध्यक्षस्थानावरून बोलताना लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या.डॉ जयश्री चव्हाण म्हणाल्या की,‘अग्निशामक दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण करतात अग्निशामक दलाला कधीही स्कूलची मदत लागली तर स्कूल नेहमी मदत करण्यास तत्पर राहील. या अग्निशामक दलाने लोटस स्कुलला भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ बी.पी.रोंगे, विश्वस्त दादासाहेब रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे उपाध्यक्ष एच.एम बागल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी दिवटे स्वागत अर्जुन जगन्नाथ यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार समीर मुलाणी यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक ए.बी.रुपनर, व्ही.पी. सुरणीस,एच.एन.खेडकर, सचिन निकम,अमीर इनामदार, अमोल ढोणे,आकाश गायकवाड, राहुल हागरे, सागर शिंदे, ज्ञानेश्वर वायदंडे आदी उपस्थित होते.