सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी गाव भेट दौरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी गाव भेट दौरा.

     


                मंगळवेढा:सकल मराठा समाजाच्या वतीने मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी रोजी मुंबई येथे दौऱ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

                त्याचे प्रबोधन व प्रचार करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये गाव भेट दौरा करण्यात आला यामध्ये ढवळस,मुढवी,बठाण,ब्रह्मपुरी,माचणुर,तामदर्डी,मरवडे या गावामध्ये जाऊन मराठा बांधवांना तांदूळ व अष्टगंध देऊन मुंबईच्या मोर्चाचे आमंत्रण देण्यात आले.

             


                 सर्व गावांनी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन देण्यात आले आज भोसे व आंधळगाव गटामधील गावांमध्ये गाव बेड दौरा करण्यात येणार आहे.

               तरी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. सदर मोहीम भरपूर दिवस चालणार असल्यामुळे जे सहभागी होणार आहेत त्यांनी आपली स्वतःची खाण्याची राहण्याची सर्व साहित्य सोबत घ्यावयाचे आहे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.test banner