१ जानेवारी - फुले दांपत्य सन्मान दिवस. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १ जानेवारी, २०२४

१ जानेवारी - फुले दांपत्य सन्मान दिवस.

 


आज आपण सर्व जन फुले दाम्पत्य दिन साजरा करत आहोत कारण आजच्या दिवशी म्हणजे १ जानेवारी १९४८ रोजी भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली.

'निरक्षरता' हे गुलामगिरीचं मुळ कारण असल्याने त्यांनी मागासवर्गीयांसाठी विविध ठिकाणी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.माणूस हा जन्माने वा जातीने नव्हे तर,आपल्या कर्तुत्वाने श्रेष्ठ-कनिष्ठ ठरत असतो,हा विचार त्यांनी रयतेला दिला.सामाजिक व आर्थिक विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेला झुकारून समतेवर आधारित नवसमाजाची निर्मिती करण्यासाठी फुलेंनी 'सत्यशोधक समाज' ची स्थापना केली. गरीब,निर्धन मुलींचे विवाह कमी खर्चात संपन्न व्हावेत,यासाठी (Mahatma Jyotiba Phule) फुलेंनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरू केली.त्यामुळे हुंडा घेऊन लग्न करण्याच्या अमानवीय पद्धतीवर गदा आली.विधवा मुलींच्या केशवपन पद्धतीविरुद्ध लढा पुकारून त्यांनी ती पद्धती बंद करण्यास भाग पाडले.

इतकेच नव्हे तर,अज्ञानाच्या अंधारात बंदिस्त स्त्रियांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडेंच्या वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेची मुहूर्तमेढ करून स्त्री शिक्षणाचे नवं पर्व सुरू केलं.ह्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ज्योतिषांनी सावित्रीबाई फुले यांची नियुक्ती केली.ही शाळा पारतंत्र्याच्या काळातील पहिली मुलींची शाळा गणली गेली अन् सावित्रीबाई ह्या देशातील पहिल्या शिक्षिका म्हटल्या गेल्या.फुलेंना स्त्रियां विषयी नितांत आदर व आपुलकी होती.ज्योतिबा म्हणत,"स्त्रियांना 'चूल अन् मुल' या चौकटीत बंदिस्त करायला नको.कारण एक स्त्री शिकली तर,एक कुटुंब शिक्षित होते. पण साऱ्या स्त्रिया शिकल्या तर,संपूर्ण देश जागृत होतो".

 

"बारा वर्षाखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे",ही त्यांची मागणी होती.त्यांनी 'हंटर कमिशन' पुढे आपली कैफियत मांडताना त्यांनी आपल्या आवेशपूर्ण वक्तव्यात म्हटलं की,केवळ "उच्चवर्णियांसाठीच शैक्षणिक धोरण न मांडता,समानतेच्या आधारावर तळागाळातील लोकांच्या पाल्यांसाठीही शिक्षणाची सोय व्हावी".त्यांच्या मतानुसार समाजातील गरजू उपेक्षित घटकांना शिक्षण दिलं तर,सामाजिक गुलामगिरी संपुष्टात येऊन आर्थिक संपन्नता येईल.महत्वाचे म्हणजे मागासवर्गीयांमध्ये आपल्या मानवी हक्कांची जाणीव निर्माण होईल. (Mahatma Jyotiba Phule) ज्योतिबा हे सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते,हे दृष्टोत्पत्तीस येते.


ज्योतिबा म्हणत, विद्येविना मती गेली,मतीविना निती गेली,नीतिविना गती गेली,गतिविना वित्त गेले,इतके अनर्थ अविद्येने केले*. स्त्रियांना शिक्षण मिळावे अन् तत्कालिन समाजातील निरक्षरता व गुलामगिरीचं उच्चाटन व्हावं, यासाठी (Mahatma Jyotiba Phule) फुले दांपत्याने सारं आयुष्य पणाला लावलं.आपल्या शाळेकडे प्रस्थान करताना,त्यांना कर्मकांडी समाजाच्या छळाला सामोरे जावे लागायचे.अर्वाच्य शब्दात टोमणे मारणे,अंगावर शेणचिखल फेकणे आदी अमानुष कृत्ये केली जायायची.इतकेच नव्हे तर, ऐकेप्रसंगी तर डोक्यावर दगड लागून सावित्रीबाई अक्षरशः रक्तबंबाळ झाल्या होत्या.तथापि संयमशील राहून फुले दांपत्याने तसूभरही विचलित न होता,आपली ध्येयपूर्ती करण्यासाठी वाटचाल सुरूच ठेवली.त्याचं फलित म्हणजे आज सावित्रीच्या लेकी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात आघाडी घेताना दिसताहेत,ही फुले दाम्पत्याचीच पुण्याई म्हणावी.यास्तव त्यांना त्रिवार मानाचा मुजरा!

 

सावित्रीबाईंनी अनाथ मुले-मुली,विधवा,परित्यक्त्या महिलांना आपल्या दारी आश्रय दिला.स्त्री शिक्षणाची मोहीम राबविण्याआधी फुलेंनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केलं. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती राष्ट्राला उद्धारी' या शब्दात (Mahatma Jyotiba Phule) फुलेंनी रयतेला स्त्री महात्म्य विषद केलं.सन १८७७ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत फुले दांपत्याने गावोगावी फिरून निधी जमवला.याशिवाय धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम उभारून तेथे सुमारे एक हजार अनाथ-निराधार लहान मुलांची भोजन व्यवस्था केली.प्रतिबंधक गृहातील मुलांना सावित्रीबाईंनी मायेची ऊब देत त्यांना आपलेसे केले.पुण्यात प्लेगची साथ पसरली असता,त्याकडे इंग्रज सरकारने वैद्यकीय साधनसामग्री देण्यास अक्षम्य दुर्लक्ष केलं.त्याचा फुले दांपत्याने जाहीर धिक्कार केला.तथापि,आपला दत्तक पुत्र डॉ.यशवंतराव यांनी प्लेगग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत.अखेर या लढ्यात त्यांचा अन् सावित्रीबाईंचा प्लेगची लागण होऊन दुःखद निधन झाले.अशाप्रकारे त्यांनी लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.त्यांच्या महान बलिदानाला आम्ही त्रिवार वंदन करतो.वास्तवात फुले दाम्पत्य हे मानवतावादी धर्माचं मूर्तिमंत प्रतिक होत,हे सिद्धीस येते.


ज्योतिबा म्हणत, विद्येविना मती गेली,मतीविना निती गेली,नीतिविना गती गेली,गतिविना वित्त गेले,इतके अनर्थ अविद्येने केले*. स्त्रियांना शिक्षण मिळावे अन् तत्कालिन समाजातील निरक्षरता व गुलामगिरीचं उच्चाटन व्हावं, यासाठी (Mahatma Jyotiba Phule) फुले दांपत्याने सारं आयुष्य पणाला लावलं.आपल्या शाळेकडे प्रस्थान करताना,त्यांना कर्मकांडी समाजाच्या छळाला सामोरे जावे लागायचे.अर्वाच्य शब्दात टोमणे मारणे,अंगावर शेणचिखल फेकणे आदी अमानुष कृत्ये केली जायायची.इतकेच नव्हे तर, ऐकेप्रसंगी तर डोक्यावर दगड लागून सावित्रीबाई अक्षरशः रक्तबंबाळ झाल्या होत्या.तथापि संयमशील राहून फुले दांपत्याने तसूभरही विचलित न होता,आपली ध्येयपूर्ती करण्यासाठी वाटचाल सुरूच ठेवली.त्याचं फलित म्हणजे आज सावित्रीच्या लेकी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात आघाडी घेताना दिसताहेत,ही फुले दाम्पत्याचीच पुण्याई म्हणावी.यास्तव त्यांना त्रिवार मानाचा मुजरा!

 

सावित्रीबाईंनी अनाथ मुले-मुली,विधवा,परित्यक्त्या महिलांना आपल्या दारी आश्रय दिला.स्त्री शिक्षणाची मोहीम राबविण्याआधी फुलेंनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केलं. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती राष्ट्राला उद्धारी' या शब्दात (Mahatma Jyotiba Phule) फुलेंनी रयतेला स्त्री महात्म्य विषद केलं.सन १८७७ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत फुले दांपत्याने गावोगावी फिरून निधी जमवला. याशिवाय धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम उभारून तेथे सुमारे एक हजार अनाथ-निराधार लहान मुलांची भोजन व्यवस्था केली.प्रतिबंधक गृहातील मुलांना सावित्रीबाईंनी मायेची ऊब देत त्यांना आपलेसे केले.पुण्यात प्लेगची साथ पसरली असता,त्याकडे इंग्रज सरकारने वैद्यकीय साधनसामग्री देण्यास अक्षम्य दुर्लक्ष केलं.त्याचा फुले दांपत्याने जाहीर धिक्कार केला.तथापि,आपला दत्तक पुत्र डॉ.यशवंतराव यांनी प्लेगग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत.अखेर या लढ्यात त्यांचा अन् सावित्रीबाईंचा प्लेगची लागण होऊन दुःखद निधन झाले.अशाप्रकारे त्यांनी लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.त्यांच्या महान बलिदानाला आम्ही त्रिवार वंदन करतो. वास्तवात फुले दाम्पत्य हे मानवतावादी धर्माचं मूर्तिमंत प्रतिक होत,हे सिद्धीस येते.

या फुले दाम्पत्य नी स्थापन केलेल्या शाळेमध्ये पहिल्या शिक्षिका म्हणून स्वतः सावित्रीबाई फुले यांनी आपले शैक्षणिक कार्य सुरु केले. त्यामुळे पुढील स्त्री जीवनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटली आणि त्यांच्या आयुष्यला दिशा मिळाली. या कार्यासाठी काल आज उद्या जगाच्या पाठीवर फुले दाम्पत्याचे स्मरण कायम राहीन म्हणून आपण फुले दांपत्या सन्मान दिन साजरा करू.


संकलन 

- अजय आदाटे, मंगळवेढा.


test banner