मंगळवेढा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली दामाजी शुगरचे कार्यकारी संचालक यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनामध्ये म्हटले आहे की मागील वर्षी दामाजी कारखान्याकडे गलितास आलेल्या ऊसाला प्रति टन 2300 रुपयाचा हप्ता दिलेला आहे.
परंतु साखरेचे दर लक्षात घेता एफआरपी पेक्षा जास्त चारशे रुपये चा हप्ता शेतकऱ्यांना देणे सहज शक्य आहे दामाजी कारखाना अडचणीत असताना मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्यावरती विश्वास दाखवून व माझ्या तालुक्यातला सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी ऊस दिलेला आहे.
यावर्षी पाऊस काळ कमी झाल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत साखरेला दर हे चांगला मिळाल्यामुळे कारखाना सुद्धा फायद्यात आहे.म्हणून शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे उसाचे पैसे मिळायला पाहिजेत यावर्षी उसाच्या वजनामध्ये घट येणार आहे.
एकरी उत्पादन सुद्धा कमी निघणार आहे. कारखान्याला ऊस सुद्धा कमी पडणार आहे त्यामुळे दिवाळीपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्याला गेल्यावर्षीच्या तुटलेल्या ऊसाला चारशे रुपये चा हप्ता दिला तरच शेतकरी दामाजी कारखान्याला ऊस घालेल या सर्व गोष्टीचा विचार करून कारखान्याचे गाळप व्यवस्थित व्हायचे असेल तर शेतकऱ्यांना तात्काळ 400 रुपये चा हप्ता देणे उचित होईल व कारखाना सुद्धा अडचणीत येणार नाही असे म्हटले आहे यावेळी जिल्हा संघटक युवराज घुले आबा खांडेकर संतोष सोनगे सिद्धराम होलोटगी आप्पासो पाटील श्रीकांत पाटील बाबासो कापले विक्रांत पाटील रोहित भोसले पांडुरंग बाबर सुनील बंडगर राजेंद्र राणे चंद्रकांत पाटील विजय पाटील व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.