यावेळी बोलताना कार्यकारी संचालक पाटील म्हणाले कि,युटोपियन शुगर्स ने गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये ६३२३११ मे. टन इतक्या ऊसाचे गाळप करीत १०. १५% इतक्या सरासरी रिकव्हरी ने ६४१६०० क्विं.इतकी साखर उत्पादित केली आहे. युटोपियन शुगर्स ने आत्तापर्यंत ऊस उत्पादकांना २२५० प्रमाणे होणारी रक्कम रु. १४२२७ लाख या पुर्वीच ऊस उत्पादक यांना अदा केलेली आहे.
मंगळवेढा व परिसरामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे कमी पाऊसा मुळे इतर पिकांच्या माध्यमातून नेहमी प्रमाणे मिळणारे आर्थिक उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे संपूर्ण ऊस उत्पादक हा अडचणीत आहे. युटोपियन शुगर्स ने आजवर सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऐन दिवाळीच्या सणाकरिता रक्कम रुपये ५५ प्रमाणे होणारी एकूण रक्कम ३४७. ७ लाख इतकी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. सदर ची रक्कम ही एफ. आर. पी. पेक्षा जास्तीची होत असल्याने युटोपियन शुगर्स ने सुरुवाती पासूनच एफ. आर. पी. रकमे पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
दुष्काळी परिस्थितीमध्ये दिवाळीच्या तोंडावरती सदर ची रक्कम मिळत असल्याने ऊस उत्पादकांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीची साखर हि घरपोच देण्यात येणार असल्याचे सांगून कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी ऊस उत्पादकांना व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत .
या प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी वर्ग उपस्थित होता.