श्री.गणेश यादव सर पत्रकारितेतील मास्टर ऑफ जर्नलिजम हा पदवित्तर कोर्स उत्तीर्ण - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

श्री.गणेश यादव सर पत्रकारितेतील मास्टर ऑफ जर्नलिजम हा पदवित्तर कोर्स उत्तीर्ण

 


टीम - संवाद न्यूज : 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या पत्रकारिता विभागातील M.J मास्टर ऑफ जर्नलिज्म हा पदवित्तर कोर्स श्री. गणेश यादव सर उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी याच विषयात पदवी कोर्स करताना विद्यापीठाची शिष्यवृत्ती सुद्धा मिळवली होती. 
पत्रकाराने समाजात घडणार्‍या घडामोडी व्यवस्थित शब्दबद्ध करणे, त्याची मांडणी करणे एवढेच नाही तर समाजात त्याचा सकारात्मक बदल घडवने यासाठीच पत्रकारिता केली पाहिजे. त्यामुळे सरांनी जे विद्यापीठिय ज्ञान मिळवले आहे तेत्यांनी सामाजिक प्रश्नांना न्याय मिळेल ह्या भूमिकेतून व्यवस्थेसामोर मांडले पाहिजे अशी आशा व्यक्त होत आहे. 
सध्या स्वयं घोषित पत्रकार उथळ ज्ञानाने समाजात अक्कल पाजळून सामाजिक दरी निर्माण करू पाहत आहेत. आणि पत्रकारिता बदनाम करत आहेत. असल्या प्रवृत्तींना आळा घालणे हे सुद्धा काम येत्या काळात करावे लागणार आहे. 
सर जवाहरलाल विद्यालयात कार्यरत आहेत. शिक्षण पद्धतीत टेक्नॉलजीचा वापर करून मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचे त्यांचे प्रयत्न चालू असतात. सामाजिक कामातही त्यांचा नेहमी चांगला सहभाग राहिला आहे. मराठा वधू वर सूचक मंडळाचे काम करताना  तालुकस्तरीय मेळावे घेण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. सरांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा. 
टीम - संवाद न्यूज - मंगळवेढा