श्री संत दामाजी महाविद्यालय कुस्ती स्पर्धेत अव्वल. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

श्री संत दामाजी महाविद्यालय कुस्ती स्पर्धेत अव्वल.


मंगळवेढा:- 

श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या खळाडूंनी तालुका व जिल्हास्तरावरील कुस्ती स्पर्धेत अव्वल स्थान मिळवीत घवघवीत यश संपादन केले आहे.


सदर स्पर्धेत स्वराज्य सुहास पडवळे याने 79 किलो वजन गटात जिल्हास्तरावरती प्रथम क्रमांक तसेच करण राजेंद्र दवले 71 किलो वजन गटात जिल्हास्तरावरती प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच शिवतेज हजारे याने 60 किलो वजन गटात तालुका स्तरावरती प्रथम तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तर शुभम दवले याने 72 किलो वजन गटात तालुकास्तरावरती प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.


सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा नावलौकिक प्राप्त केलेला आहे सदर गुणी कुस्तीपट्टूचे  महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्य परमेश्वर होनराव यांनी सत्कार करून अभिनंदन केले.


स्वराज्य पडवळे आणि करण दवले यांची विभागीय स्तरावर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सर्व खेळाडूंना प्रा.विजय दत्तू व प्रा.गणेश जोरवर यांचे मार्गदर्शन लाभले.


सर्व यशस्वी खेळाडूंचे श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा,सचिव किसनराव गवळी,विष्णू चौगुले यांच्यासह सर्व पदाधिकारी,प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.


यावेळी प्रा. धनाजी गवळी,प्रा.शैलेश मंगळवेढेकर,प्रा.गोविंद गायगोपाळ,प्रा.उत्तम सुर्यगंध,प्रा गणेश भुसे,प्रा.धनंजय मेहेर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.

test banner